मुंबई : दोन महिन्यांपूर्वी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या बातमीमुळे राजकारणातून ब्रेक घेतलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आता देवदर्शनाच्या निमित्ताने ‘शिवशक्ती दौरा’ करणार आहेत. पंकजाताई भाजप (BJP) सोडून काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार आहेत व त्यांनी सोनिया गांधींची (Soniya Gandhi) भेट देखील घेतली, अशी ती बातमी होती. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केल्यामुळे पंकजाताई प्रचंड नाराज झाल्या होत्या. माझ्या प्रतिष्ठेवर सवाल उठवला गेला असा आरोप त्यांनी ही बातमी पसरवणार्या माध्यमांवर केला होता. या गोष्टीमुळे त्यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेतला. मात्र आता त्या पुन्हा सक्रिय होणार असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये दौरा करणार आहेत.
पंकजा मुंडे या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. आजवर खूप मोठी संधी मिळालेली नसतानाही त्यांनी भाजपची साथ सोडली नाही. मात्र माध्यमांमध्ये होणार्या या चर्चेमुळे त्या दुखावल्या गेल्या होत्या. मी राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांपैकी कोणालाच भेटले नसून त्यावेळी मी भाजपच्या मध्यप्रदेशच्या कार्यालयात होते, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत.
विशेष म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. या दौऱ्यामध्ये पाच हजार किलोमीटरचा प्रवास पंकजा मुंडे करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शनासाठी पंकजा मुंडे दौऱ्यावर जाणार आहेत.
पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी आणि त्यासोबत शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेच्या दर्शनासाठी असल्याने हा शिवशक्ती दौरा असल्याचे सांगितले जात आहे. हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ब्रेकवरुन परतलेल्या पंकजा मुंडे राजकारणात कधी सक्रिय होणार? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे. पण, दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करतील का? असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या या दर्शन दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…