Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाTeam India: राहुल द्रविडच्या खुलाशाने खळबळ, वर्ल्डकपसाठी १८ महिने आधीच बनवला होता...

Team India: राहुल द्रविडच्या खुलाशाने खळबळ, वर्ल्डकपसाठी १८ महिने आधीच बनवला होता प्लान

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमसाठी (team india) पुढील तीन महिने खूप महत्त्वाचे असणार आहेत. ३० ऑगस्टपासून आशिया कपची (asia cup) सुरूवात होत आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकपसारख्या (world cup) मोठ्या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.

मात्र टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनसह या स्पर्धेत खेळणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यातच भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख कोच राहुल द्रविडने खुलासा केला आहे की त्यांनी १८ महिने आधीच ठरवले होते की वर्ल्डकपसाठी चौथ्या आणि पाचव्या नंबरवर कोण फलंदाजी करणार आहे. मात्र त्याची रणनीती कोणत्या कारणाने बिघडली याबाबतचे मोठे विधान केले आहे.

१८ महिन्यांआधी बनवलेल्या प्लानवर फिरवले पाणी

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले की वर्ल्डकपसाठी चौथ्या आणि पाचव्या नंबरवरील फलंदाज १८ महिन्यांआधीच ठरवण्यात आला होता. मात्र तीन प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने त्यांची रणनीती बिघडली. द्रविड म्हणाले, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ऋषभ पंत सारखे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संघ मॅनेजमेंटला याबाबत थोडे प्लान बदलावे लागले.

द्रविडने आशिया कपसाठी टीमच्या रवानगीने म्हटले, चौथ्या आणि पाचव्या नंबरसाठीच्या फलंदाजासांठी खूप चर्चा झाली आणि असे वाटते की जसे की आमच्याकडे याबाबत स्पष्टता नाही की या स्थानांवर कोण फलंदाजी करणार. मी तुम्हाला १८ ते १९ महिने आधी सांगू शकत होतो की या दोन स्थानांवर कोणते तीन खेळाडू फलंदाजी करतील.

टीम इंडियामध्ये या खेळाडूंची कमतरता

ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात दुखापतग्रस्त झाला होता तर अय्यर आणि राहुल अनुक्रमे पाठ आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे मार्च आणि मेमध्ये संघाबाहेर गेले होते. या दोघांना आता आशियाकपसाठी संघात निवडण्यात आले आहे. तर राहुल स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यात बाहेर असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -