मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल ‘शासन आपल्या दारी’च्या (Shasan Aplya Dari) निमित्ताने परभणी दौर्यावर होते. येथून मुख्यमंत्री थेट गुजरातला (Gujrat) रवाना झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांच्यामागून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गुजरातला रवाना झाले. येथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे, शिवाय या भेटीचे कारण देखील समोर आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातच्या गांधीनगर येथे क्षेत्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये शारीरिक शोषण आणि अत्याचार या प्रकरणाच्या तात्काळ चौकशी बाबत चर्चा होणार आहे. पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संदर्भात विषयांवर देखील चर्चा होणार आहे. याचबरोबर शेजारी राज्यात परस्पर सहयोग निर्माण करण्याविषयी चर्चा होणार आहे.
गुजरातला होणार्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक प्रश्नांवर चर्चा होऊन ते मार्गी लागतील असे म्हटले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची या बैठकीतील भूमिका काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…