पवई : राज्यभरात सध्या तलाठी भरती परीक्षा (Talathi Bharati Exams) सुरु आहेत. मात्र, दरवेळी या परिक्षांच्या नियोजनात काहीतरी बिघडल्याने उमेदवारांचा संताप होताना पाहायला मिळतो आहे. कधी पेपरफुटी, कधी सर्व्हर डाऊन, तर कधी केंद्रांमध्ये घोळ यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. आज पवई आयटी पार्क (Powai IT park) येथील परीक्षा केंद्रावर गोंधळाचा प्रकार घडला. उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणीही नसल्यानं उमेदवार संतापले आणि त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला.
राज्यभरात तलाठी भरती परीक्षा पार पडत असताना या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण आणि इतर गैरप्रकार समोर येत आहेत. तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटीचा आरोप असलेला मुख्य आरोपी गणेश गुसिंगे (Ganesh Gusinge) हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत १३८ गुण प्राप्त करत पास झाला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायच झाला. तलाठी भरती परीक्षेत अशा प्रकारे उघडकीस येत असलेले गैरप्रकार पाहता या सगळ्या संदर्भात तातडीनं चौकशी समिती नेमावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मुंबई उच्च न्यायालयात या आठवड्यात याचिका दाखल करणार आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…