Mumbai Metro : ‘मेट्रो २ अ’च्या स्थानकांचे पुन्हा ऑडिट होणार!

मुंबई : मेट्रो '२ अ' आणि '७' ही मेट्रोसेवा (Mumbai Metro) सुरू झाल्यापासून वर्षभराच्या आतच या स्थानकांच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी मंडपेश्वर मेट्रो स्थानकाबाहेरील काचेचे पॅनल कोसळून एका रिक्षाचे नुकसान झाले. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सर्व मेट्रो स्थानकांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.


मेट्रो '२ अ' च्या एकूण १७ स्थानकांपैकी ३ स्थानकांवर दर्शनी भागात असलेल्या काचेच्या फलकांचा वापर करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर ज्या स्थानकाच्या दर्शनी भागात काचेचे पॅनल वापरण्यात आले आहेत, त्या ३ स्थानकांचे ऑडिट करण्यात येणार आहे. १० दिवसांच्या आत ऑडिट पूर्ण होण्याची शक्यता आहे. आढावा घेऊन इतर ठिकाणी कार्यवाही केली जाईल.


दरम्यान, आयसी कॉलनी मेट्रो स्थानकाच्या दर्शनी भागातील काचेचे पॅनल काढून टाकण्यात येत आहेत. हा सर्व खर्च कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत

मुंबईत केली दुर्मिळ वृक्षांची लागवड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या

आणखी एका मेट्रो स्थानकाचे नामकरण : ‘अथर्व युनिव्हर्सिटी – वळणई मीठ चौकी’

मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवली मालाड दरम्यानच्या वळणई - मीठ चौकी मेट्रो स्थानकाचे औपचारिक नामकरण “अथर्व