मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जपानमध्ये शासकीय अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला. आजच ते आपल्या या दौऱ्यावरुन परतले आहेत. परतल्यानंतर मुंबई विमानतळावरच त्यांना पत्रकारांनी घेरलं. यावेळेस अनेक मुद्द्यांवर ते व्यक्त झाले. भारत- जपान संबंधांविषयी बोलताना त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीकास्र देखील सोडलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की, जपानचा दौरा करून पुन्हा एकदा मातृभूमीचं दर्शन घेता आलं. मुंबईमध्ये आल्यानंतर मला अतिशय प्रसन्न वाटतंय. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ सालापासून जपानसोबत जे संबंध उत्कृष्ट केले आणि तेव्हाचे पंतप्रधान शिंजो आबेसान आणि आताचे पंतप्रधान यांच्यासोबत त्यांनी ज्या प्रकारचे संबंध प्रस्थापित केले त्यामुळे आज जपान आणि भारत खूप जवळ आले आहेत.
पंतप्रधान मोदींवर काँग्रेसने केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेस काय बोलतोय यावर मला काही बोलायचं नाही. कारण काँग्रेस ही एक फ्रस्ट्रेटेड पार्टी आहे. काँग्रेसने देशाबद्दल विचार करणे बंद केले आहे. आज पूर्ण देशाला हे माहित आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रगती करत आहोत. त्या दिवशी पण चांद्रयान लँड करत होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दक्षिण आफ्रिकेमध्ये बसून मिनिट टू मिनिट याची माहिती घेत होते. आपल्या वैज्ञानिकांनी चांगलं काम केलं आहे तर त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रधानमंत्री जाणार नाहीत तर कोण जाणार? त्यामुळे मला असं वाटतं की एवढ्या खालच्या स्तरावर राजकारण करण्यावरती विरोधी पक्ष उतरला आहे, असं फडणवीस म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले, नाना पटोलेंना कधीच मी गांभीर्याने घेतलेले नाही. नाना पटोले सकाळी एक बोलतात दुपारी एक बोलतात आणि संध्याकाळी एक बोलतात. मी जपानला गेलो भारताकरिता काहीतरी घेऊन आलो. मुंबईकरता काहीतरी घेऊन आलो. मी तिकडे काही फिरायला गेलो नव्हतो. नाना पटोले महाराष्ट्राभर कशाकरता फिरतात आणि काय करतात हे मला माहित आहे. ते माझे मित्र आहेत ते काय बोलले असतील तर मी त्यांना माफ करतो.
फडणवीस म्हणाले की, जपान मधल्या मराठी लोकांनी मराठमोळं स्वागत केलं हा माझ्याकरता एक खूप चांगला अनुभव होता. त्यासोबत भारतीय दुतावासामध्ये चांद्रयान मोहिमेच्या संदर्भात लँडिंग करिता सर्व लोक जमा होते, त्यावेळी त्यांच्यासोबत लँडिंग पाहाणं ही एक पर्वणी होती. त्यांच्यातला उत्साह, त्यांच्यातली देशभक्ती इतकी प्रचंड होती, की आमच्यासमोर त्यांनी जपानमध्ये भारत जीवंत केला. त्यामुळे त्या सगळ्या जपान मधील भारतीयांचे मी अभिनंदन करतो.
मला मानद डॉक्टर पदवी त्या ठिकाणी दिली आहे, याचा मला आनंद आहे. त्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. हा काही माझा सन्मान नाही, हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. कारण मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलो होतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…