अजय मर्चला यांना बाहेरगावी जायचे होते. त्यासाठी ते ऑनलाइन ट्रेनचे तिकीट बुक करत होते. त्यावेळी त्यांचे ट्रेनचे तिकीट बुक झाले नाही; परंतु त्यांच्या बँक खात्यातून १६२७/- रुपये कट झाले. त्यांना थोड्या वेळानंतर बँकेतून कट झालेली रक्कम पुन्हा रिफंड केली जाईल, असा अनोळखी मोबाइल नंबरवरून फोन आला. त्यानंतर अजय यांना पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरून कॉल आला आणि RUSK DESK App डाऊनलोड करण्यास सांगितले. हा ॲप अजय यांनी डाऊनलोड केला. त्यानंतर भलतेच घडले. अजय यांच्या क्रेडिट कार्डद्वारे ९३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची बाब अजय यांच्या लक्षात आली. अजय यांनी सायबर गुन्हे अंतर्गत तक्रार केली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोस्ट हद्दीतील हा प्रकार होता. मोबाइल नंबरचे लोकेशन हे महाराष्ट्राबाहेरचे होते. ज्यांच्या नावाने अजय यांना सुरुवातीला फोन करण्यात आला होता. तो मोबाइल नंबर कोणाचा याची पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर तो तामिळनाडूमधील असल्याचे कळले. मोबाइलधारकाचे आधारकार्डसह केवायसी प्राप्त करण्यात पोलिसांना यश आले होते; परंतु क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक करणारी व्यक्ती दुसरी असल्याचे पोलीस पथकाच्या लक्षात आले.
मीरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस उप आयुक्त (गुन्हे)अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांनी एक तपास पथक तयार केले. या पथकात स.पो.नि. स्वप्नील वाळ,पो.उप निरी. प्रसाद नोकर, म.पो.हवा. माधुरी पिंडे, पो.अं. गणेश इलग, प्रवीण आव्हाड, म.पो.अं. पल्लवी निकम, अमिना पठाण, सुवर्णा माळी, पो.अं. कुणाल सावळे, प्रशांत बोरकर यांचा समावेश होता. या पथकाने ॲपच्या माध्यमातून अशा पद्धतीने फसवणूक झाली. त्या माहितीचे अवलोकन केले. तक्रारदार अजय यांची फसवणूक रकमेचा वापर करून RAZ SAFE GOLD PAYTM द्वारे करण्यात आले होते. बहुतांश सोन्या-चांदीचे व्यापारी RUST DESK APP चा वापर करत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला पकडण्याऐवजी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कसे ट्रान्झिक्शन झाले याचा प्राधान्याने तपास केला. ९३ हजार रुपयांच्या शॉपिंग केली गेली, त्या संबंधितांना तत्काळ पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आणि आठ दिवसांच्या आत अजय यांच्या खात्यावर ही रक्कम पुन्हा वळती करण्यात यश मिळाले. या प्रकारामुळे पोलीस पथकाच्या एक गोष्ट लक्षात आली की, अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून आपण कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला मानला तर तो असा महागात पडू शकतो. ॲप डाऊनलोड करताना स्क्रीनिंग होते. त्यातून ओटीपी नंबरसह अनेक गोपनीय माहिती चोरण्याचा प्रकार घडू शकतो. अजय मर्चला यांच्याबाबतीत तेच घडले.
अशा प्रकारे जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी सायबर पोलिसांकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर घेऊन त्यावर पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती उघड करू नये. आपले बँक खाते, जन्मदिनांक, ओटीपी (OTP) वा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये. अशा फसव्या कॉलला प्रतिसाद देऊ नये. अशा स्वरूपाचे कॉल प्राप्त झाल्यास तत्काळ बँकेसोबत संपर्क साधावा. अशा प्रकारे फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा १९३० वा हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार द्यावी, असे आवाहन मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना केले आहे.
maheshom108@gmail.com
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…