Neeraj Chopra : नीरज चोप्राने साधल्या एका भाल्यात दोन संधी!

ऑलिम्पिकचं तिकीट केलं निश्चित


नवी दिल्ली : भालाफेक स्पर्धेत (Javelin Competition) भारताची मान उंचावणारा खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी केली आहे. पहिल्याच भालाफेकीत लांब पल्ला गाठत नीरजने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ (World Athletics Championship 2023) अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही (Paris Olympic 2024) आपला प्रवेश निश्चित केला आहे.


नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीतील जागा पक्की केली. यासाठी ८३.०० मीटर हा पात्रता मार्क होता अन् नीरजने पहिल्याच प्रयत्नात सर्वात लांब भाला फेकला. तसेच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता ८५.५० मीटर पूर्ण झाल्यामुळे नीरजचा २०२४ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश निश्चित झाला आहे.


भारताच्या डी. पी. मनूने पहिल्या प्रयत्नात ७८.१० मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ८१.३१ मीटर लांब भाला फेकला. जर्मनीचा ज्युलियन वेबर ८१.०५ मीटरसह टॉपर राहिला, तर गतविजेत्या पीटर अँडरसनला ७८.०२ मीटर लांब भाला फेकता आला. गेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियशिपमध्ये पीटर अँडरसनने ९०.५४ मीटर भालाफेक करत सुवर्ण पदकावर कब्जा केला होता. त्यामुळे नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी नीरजला अँडरसन बरोबरच पाकिस्तानच्या अर्शद नदीमचे देखील कडवे आव्हान असणार आहे.


भारताला आतापर्यंत वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकता आलेले नाही. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये लांब उडीत कांस्य पदक पटकावले. त्यानंतर १९ वर्षांनी नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले. त्यामुळे नीरजसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदकडून हवालामार्गे आले २० लाख ? तपासकर्त्यांसमोर नवीन कोडे

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर यंत्रणांना डॉ. उमर, डॉ.

लाल किल्ला स्फोट प्रकरणात नवे धागेदोरे; आरोपी डॉ. उमर उन-नबी नुहमध्ये गुप्तपणे वास्तव्यास असल्याचा तपास यंत्रणांचा दावा

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ ह्युंडाई i20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर सुरू असलेल्या चौकशीत

भारत-नेपाळ सीमेवर कारवाई; व्हिसा नसल्याने दोन विदेशी नागरिक अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणि

छत्तीसगडमधील सुकमात चकमक, तीन नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या