भाईंदरचे शासकीय रुग्णालय व्हेंटिलेटरवर

अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची गैरसोय


भाईंदर : मीरा भाईंदरमध्ये झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या त्यातच एकमेव असलेले शासकीय रुग्णालय त्यात सुध्दा वैद्यकीय सुविधा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव, वैद्यकीय साधनांची कमतरता यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय पाहता भाईंदर पश्चिमेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयच व्हेंटिलेटरवर असल्याची स्थिती झाली आहे, त्यामुळे वैद्यकीय सेवेअभावी कळवा महापालिका रुग्णालयात झालेल्या मनुष्यहानी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


मीरा भाईंदर शहरात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ह्या शासकीय रुग्णालयात अवघ्या २०० खाटा आहेत. यासाठी शासन मंजुर ३६५ डॉक्टर व कर्मचारी आहेत. शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह इतर अनेक योजनांचा लाभ रुग्णांना उपलब्ध आहे. तसेच राज्य शासनाच्या मोफत वैद्यकीय चाचणी जसे की ईसीजी, क्ष किरण, सी. टी. स्कॅन, रक्त तपासणी यासह मोफत औषधाची सुविधा उपलब्ध आहे. परंतु वैद्यकीय साधनांची कमतरता, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे यातील एकही सुविधा सुरळीत नाही.


रुग्णालय प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पुरेशा आर्थिक निधीची तसेच रिक्त पदे भरण्यासाठी मागणी करूनही त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे रुग्णांचे आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक अजित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) मिलिंद म्हैसकर यांच्याकडे निवेदन देऊन गैरसोयी दूर करण्याची विनंती केली आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे शासकीय रुग्णालय या बाबतीत नक्कीच पावले उचलेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

येऊदे कितीही अडचणीचं वारं... ‘मी जिंकून घेईन सारं’ नवी मालिका कलर्स मराठीवर

भारती आचरेकर दिसणार मराठी मालिकेत पहिल्यांदाच ! मुंबई : असं म्हणतात रक्ताच्या नात्यापेक्षा जोडली गेलेली नाती

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवरून वाद; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पुण्यात तक्रार

हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

“त्यांनी मला शिक्षकासारखे सगळे समजावून सांगितले”

मुंबई : क्रांती प्रकाश झा हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखले जाणारे अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट आणि वेब

'सनई चौघडे' मध्ये पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार अदिती सारंगधर

मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत

समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

अहमदाबाद : भारताच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्‍ये महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या