बंगळुरू : भारताचे ‘चांद्रयान ३’ (chandrayaan 3) लाँच झाल्याच्या ४१ व्या दिवशी दक्षिण ध्रुवावर (south pole) उतरले आहे. यासोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (indian space research organisation) माजी प्रमुख के सिवन (k sivan) लँडिंग पाहण्यासाठी मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्स येथे पोहोचले होते. लँडर विक्रमने जसे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले तेव्हा सिवन यांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी इस्रोच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसे चांद्रयान ३च्या यशस्वी होण्याचा आनंद इतका होता की सिवन लँडिंगनंतर घरी गेलेले नाहीत.
वृत्तवाहिनी एएनआयशी बोलताना सिवन म्हणाले, अखेर आमची प्रार्थना ऐकली. स्वप्न खरे ाले. लँडिंगचा आनंद इतका आहे की मी कालपासून घरी गेलेलो नाही. जोपर्यंत रोव्हर लँडरमधून बाहेर नव्हता आला तोपर्यंत मी कंट्रोल रूममध्ये बसलो होतो. चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरला फिरताना पाहिले आणि त्यानंतरच मी तेथून गेलो. मी रात्री उशिरा घरी पोहोचलो.
#WATCH | #Chandrayaan3 | “…Finally our prayers came true. After landing we did not come back, I was still sitting in the control room till the rover came out of the lander. Only after seeing that the rover came out of the lander and moved over the surface of the moon, I came… pic.twitter.com/jFUXbXu9pN
— ANI (@ANI) August 24, 2023
ते पुढे म्हणाले की, मी चांद्रयान २च्या लँडिंगचा दिवस आणि बुधवारची तुलन केली तर निश्चितपणे चंद्रावर जाण्याचे आणि दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे माझे स्वप्न काल साकार झाले. यासाठी मी खूप खुश आहे. चांद्रयान २ मध्ये झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे आम्हाला तेव्हा यश मिळाले नव्हते नाहीतर आम्ही चार वर्षांआधीच खूप काही मिळवले असते. आम्ही आज खूप खुश आहोत की आम्ही त्या चुकीने शिकलो आणि ती दुरुस्त केली. २०१९मध्ये आम्ही चांद्रयान ३ला कॉन्फिगर केले आणि काय सुधारणा केली पाहिजे हे ही २०१९मध्ये ठरवले होते. बुधवारी आपल्या या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळाले.
चांद्रयान २मध्ये काय झाली होती चूक?
चंद्रावर कोणतेही यान उतरवण्यासाठी चार प्रक्रिया वापरल्या जातात. जेव्हा चांद्रयान २चे लँडिंग होत होते तेव्हा लँडर आपल्या रस्त्यावरून टर्मिनल डिसेंट फेजवरून तीन मिनिटे आधी भटकला. लँडरला ५५ डिग्री अंशात फिरायचे होते मात्र तो ४१० डिग्रीने अधिक फिरला अखेर हार्ड लँडिंग झाले. चांद्रयान ३मध्ये ही चूक दुरूस्त करण्यात आली. सोबतच वेग आणि दिशेला नियंत्रित करण्यासाठी लावलेल्या इंजिनला वेळेच्या हिशेबाने वापरण्यात आले.