लखनऊ:उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) पशुधन मंत्री धर्मपाल सिंह सध्या चांगलेच चर्चेत आहेत. खरंतर या मंत्र्यांनी आपल्या पदाचा फायदा उचलला आहे आणि सर्व नियम तोडताना लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनच्या आत प्लॅटफॉर्मवरच आपली कार घेऊन गेले. नियमानुसार केवळ पायी जाणारे प्रवासीच रँपवरून जात एस्केलेटरचा वापर करतात. मंत्र्यांची गाडी जेव्हा प्लॅटफॉर्म नंबर एकवर आली तेव्हा प्रवासी चांगलेच घाबरले.
याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंत्र्यांने केलेल्या या कामावर यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही चांगलीच मजा घेतली आहे.
पावसापासून बचावासाठी स्टेशनच्या आतच नेली कार
यूपीचे मंत्री धर्मपाल सिंह यांना ट्रेन पकडण्यास उशीर झाला होता. त्यामुळे ते सरळ कार घेऊन प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले. अनेक लोकांचे म्हणणे आहे की जेव्हा मंत्री स्टेशनवर पोहोचले तेव्हा पाऊस कोसळत होता. पावसात भिजू नये म्हणून त्यांनी गाडी सरळ प्लॅटफॉर्मवरच नेली. यावेळेस त्यांनी रेल्वे नियमांचेही उल्लंघन केले. यावर अखिलेश यादव यांनीही मजा घेतली आहे. अखिलेश यादव यांनी या मंत्र्याला घेरताना म्हटले, बरे झाले की हे बुलडोझर घेऊन स्टेशनवर गेले नाहीत.
यूपी के कैबिनेट मंत्री धर्मपाल सिंह को ट्रेन पकड़नी थी। बारिश भी हो रही थी। क्या करते दिव्यांगों के चलने वाला रैंप ही सही, गाड़ी तो चढ़कर जाएगी ही। इतना चौंकने वाली कोई बात नहीं। मंत्रियों के साथ यह सब चलता रहता है। pic.twitter.com/52C51rJwc0
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) August 24, 2023
अच्छा हुआ ये बुलडोज़र से स्टेशन नहीं गये थे… pic.twitter.com/v7uHWQaNi9
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 24, 2023
रेल्वे येत नाही तोपर्यंत स्टेशनवर उभी होती कार
मिळालेल्या माहितीनुसार, पशुधन मंत्री धर्मपाल सिंह लखनऊ येथून बरेली जाण्यासाठी पंजाब मेल पकडणार होते. त्यांना स्टेशनवर पोहोचण्यास उशीर झाला. त्यात पाऊसही कोसळत होता. यानंतर ते आपली फॉर्च्युनर घेऊन दिव्यांगासाठी बनलेल्या रँपवरून स्टेशनच्या आत गेले. प्लॅटफॉर्मवरच सरळ कार आलेली पाहून तेथील लोक चांगलेच घाबरले.