मुंबई: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णीी (DS Kulkarni) पाच वर्षांनी जामिनावर तुरूंगाबाहेर आले आहेत. गुंतवणूकदार तसेच बँकेच्या फसवणुकीप्रकरणी २०१८मध्ये त्यांना अटक (arrest) करण्यात आली होती. त्यांच्यावर गुंतवणूकदार आणि बँकेने फसवल्याचा आरोप होता. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या होत्या
डी. एस. कुलकर्णी पाच वर्षानंतर जामिनाच्या जोरावर तुरुंगाबाहेर आले आहेत. पाच वर्षे तुरुंगात असलेले डीएसके यांना अखेर जामीन मिळाला आणि ते तुरुंगाबाहेर आलेत. याआधीही त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता मात्र त्यांना तुरुंगाबाहेर येता आले नव्हते. त्यांच्या १३५ मालमत्ता आहे. या प्रकल्पांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे.
डीएसके यांच्या विविध बँकांचे १२०० कोटींचे कर्ज आहे. तसेच डीएसकेंनी गुंतवणूकदारांची दोन हजार कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच डीएसके ग्रुपने अधिक व्याज देत असल्याचे अमिष दाखवत राज्यातील हजारो लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.
तसेच या प्रकरणात डीएसकेंची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी आणि जावई यांच्याविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…