Supriya Sule : अजित पवारांविषयी संजय राऊत यांचे वक्तव्य बाळबोध

  122

सुप्रिया सुळेंनी संजय राऊतांचाच घेतला समाचार


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधार्‍यांवर टीका करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य केले. आजच्या पत्रकार परिषदेत 'शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या असून त्यामधील अनेक संस्थांवर अजित पवार आहेत. या संस्थांमधून अजित पवार यांनी बाहेर पडावे', असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. मात्र त्यांच्याच आघाडीतील घटक पक्षाच्या राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संजय राऊतांचाच चांगला समाचार घेतला.


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार आणि आमचे राजकीय मतभेद आहेत, परंतु आमच्यात मतभेद नाहीत. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. या सर्व संस्थांचे काय करायचे ते आम्ही ठरवू. आम्ही नाती नेहमी जपली आहेत. घरातील नातीतर सोडा आज देशात अनेक ठिकाणी आमची नाती तयार झाली आहेत. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहेत, पवार कुटुंबियांचे संस्कार आहेत. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आहोत, संजय राऊत यांचे वक्तव्य हे बाळबोध आहे.


संजय राऊत हे नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. 'सामना' वर्तमानपत्रातूनही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. याचा विरोध करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी निदर्शनेही केली. आज मात्र महाविकास आघाडीतीलच नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्याला बाळबोध म्हटले. तर दुसरीकडे त्यांनी अजितदादांची बाजू घेतल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची नेमकी भूमिका काय याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ढोल-ताशा वाजवणाऱ्या मुस्लिम तरुणांचा व्हिडिओ व्हायरल!

मुंबई: गणेश चतुर्थीच्या आधी, डिजिटल क्रिएटर भावेशने शेअर केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात मुंबईतील

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन

मुंबई : रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्राची हिरकणी संयुक्ता काळे हिची

Modak For Ganesh Chaturthi : गणपती बाप्पासाठी घरपोच मोदक! BMCची खास सेवा, लवकर करा ऑर्डर

मुंबई : गणेशोत्सव जवळ येत असताना संपूर्ण मुंबईत बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर

मुंबईकर झाले चिंतामुक्त, जलाशयांमध्ये पाण्याचा मुबलक साठा

मुंबई : मुंबईकरांची यंदाची पाण्याची चिंता दूर झाली आहे. कारण मागील तीन - चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे

राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती

वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी मुंबई : राज्यात सप्टेंबरपासून १५ हजार ६३१ पोलीस शिपाई, चालक,

सरकारी नोकरीतील १ हजार १८९ ‘लाडक्या बहिणी' संकटात

बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी महिला व बालकल्याणची विशेष पडताळणी मोहीम मुंबई : गरीब आणि गरजू महिलांना