Pen Traffic : पेणमध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दादर सागरी पोलिसांचा मास्टर प्लॅन

जोहे-तांबडशेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास


पेण : देशासह संपूर्ण जगात पेणच्या गणेशमूर्तींची ख्याती आहे. मात्र ह्या मूर्ती विकत घेण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून विक्रेते हे स्वतःचे वाहन घेऊन येत असल्याने हमरापूर ते कळवे, दादर रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे जोहे-हमरापूर विभागातील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे यांची भेट घेतली. अजित गोळे यांनी पोलिस व नागरिकांची एकत्र मीटिंग घेऊन योग्य नियोजन करत सदर मार्गातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला व तो यशस्वी देखील केला.


अजित गोळे यांनी गणपती कारखानदार, गणपती टेंपो चालक, मिनिडोअर रिक्षा चालक, एसटी प्रशासन व पोलिसांची दोन वेळा एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत सुंदर असा मास्टर प्लॅन तयार केला. दररोज पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी, गणपती कारखानदारांचे दोन सदस्य व नागरिक हे दररोज वाहतूक कोंडी दुर करण्यासाठी कार्यरत असणार असून दररोज त्यांचे नाव आणि नंबर या व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकण्यात येत आहेत. त्यातुन जर कुठे वाहतूक कोंडी झाली असेल तर ती दुर करण्यासाठी हे प्रयत्नशील असणार आहेत. त्याशिवाय जनजागृती म्हणुन दादर सागरी पोलिस स्टेशनच्या वतीने परिसरातील सहा ठिकाणी सूचनांचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. संबंधीत सूचनांची व्हॉईस क्लिप तयार करून त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला जात आहे.


'गणपती वाहतूक नियोजन' या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार असून या ग्रुपमध्ये पोलीस, गणपती कारखानदार, एसटी प्रशासन, आजी - माजी सरपंच, पत्रकार, ग्राम पंचायत सदस्य, समाजसेवक व नागरिक यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झालीच तर त्याचा फोटो व माहिती सर्वांना समजण्यासाठी मोठी मदत होणार आहे. गणेशोत्सवा पर्यंत ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तयार केलेल्या आराखड्याचे सर्वांनी पालन करून सुखकर प्रवासासाठी सहकार्य करा असे आवाहन दादर सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित गोळे यांनी केले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Chandrashekar Bawankule : गगनचुंबी टॉवर व झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर

 महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा; मुंबईत 'मायक्रो झोनिंग' सर्वेक्षण सुरू मुंबई : एकाच परिसरात गगनचुंबी टॉवर आणि

सव्वा महिन्याच्या संसाराचा हृदयद्रावक शेवट, पोटाला दगड बांधला अन्…

Yavatmal News : यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. पोटाला दगड बांधून दोघांनी

Agriculture Minister Dattatreya Bharne : वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

मुंबई : राज्यातील मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या

Maharashtra Kesari Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या थारचा भीषण अपघात!’ गाडीचा चक्काचूर; मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचाव

सांगली : महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी किताब पटकावून कुस्तीविश्वात स्वतःचा दबदबा निर्माण करणारा स्टार पैलवान

PM YOJANA : पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS); एनसीसी छात्रांसाठी सुवर्णसंधी

PUNE : राष्ट्रीय छात्र सेना (NCC) महाराष्ट्र संचालनालयाने 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' (PMIS) अंतर्गत राज्यातील एनसीसी

Sikandar Shaikh car accident : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा भीषण अपघात; थारचा चक्काचूर, पैलवान थोडक्यात बचावला

सोलापूर : सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला-मिरज (Miraj) मार्गावर महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटू