Samanaa Newspaper Holi : भाजपने केली 'सामना'ची होळी!

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप... पाहा या होळीचा व्हिडीओ!


भांडुप : ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून (Samanaa Newspaper) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ज्या टीका करतात त्यावर अनेकदा आक्षेप घेतला गेला आहे. यावेळेस मात्र त्यांनी कहर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. याविरोधात भाजपचे मंडल अध्यक्ष प्रवीण दहितुले यांनी भांडुप पश्चिम (Bhandup west) येथे ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्राची होळी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल या दैनिकात खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


मुंबईत मेट्रोपासून एस.आर.ए. पर्यंतची अनेक विकासकामे फडणवीस यांनी मार्गी लावली. सामनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत यांनी हा इशारा समजावा. असा अवमान भाजप कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरे व राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.



जयप्रकाश सिंग, दीपक दळवी, प्रवीण दहितुले, एडवोकेट पी एस पांडे, संजय शर्मा, राहुल जाधव, जितेंद्र परब, निकिता घाडीगावकर, विजय घोसाळकर, महेश चेंदवणकर इत्यादी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण