विराटसाठी हिरेजडीत बॅट, सुरतचा व्यापारी करतोय गिफ्ट; किंमत वाचून बसेल धक्का
यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाची सुरूवात हाेणार आहे. विश्वचषकाआधी विराटसाठी एक हिरेजडीत बॅट, सुरतचा व्यापारी भेट देणार आहे. त्याची किंमत १० हजार रूपये आहे.
भारताचा आयकॉन खेळाडू विराट कोहली याचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. विराट कोहलीसाठी चाहते वेगवेगळ्या पद्धतीने आपले प्रेम दाखवत असतात. सूरतच्या व्यापाऱ्याने विराट कोहलीसाठी हिऱ्यांची बॅट तयार केली आहे. ती १.०४ कॅरटची हिरेजडीत बॅट सुरतच्या व्यापाऱ्याने विराट कोहलीसाठी तयार केली आहे. विश्वचषकाआधी त्याला ही बॅट विराट कोहलीला भेट द्यायची आहे. या बॅटची किंमत तब्बल १० लाख रुपये इतकी आहे.
या बॅटची लांबी १५ मिली मीटर आहे. तर रुंदी ५ मिली मीटर इतकी आहे. डायमंड टेक्नोलॉजी तज्ज्ञ आणि सुरतमध्ये लेक्सस सॉफ्टमॅक कंपनीचे अधिकारी उत्पल मिस्त्री यांच्या देखरेखीत ही बॅट तयार करण्यात आली आहे. उत्पल मिस्त्री यांनी एका संकेतस्थळाला मुलाखत दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, आम्ही विराट कोहलीसाठी तयार केलेल्या हिऱ्याच्या बॅटची किंमत दहा लाखांच्या आसपास आहे. त्याचा आकार १५ मिली ते ५ मिमी इतका आहे. हिऱ्याने तयार केलेली ही बॅट विराट कोहलीला भेट द्यायची आहे. कृत्रिम नव्हे तर प्राकृतिक हिऱ्यापासून बॅट तयार केलेली आहे. हिऱ्याला बॅटच्या आकारात कट करण्यात आलेय. त्यानंतर त्याला पॉलिश केले आहे.
दरम्यान, विराट कोहलीने आजच आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. विराट कोहली सध्या आराम करत आहे. आशिया चषकात तसेच विश्वचषकातही विराट कोहली दिसण्याची शक्यता आहे.