मुंबई : चातुर्मासाची सुरुवात करणारा श्रावण (Shrawan) महिना तसा सणासुदीने भरलेलाच. याच श्रावणातील नागपंचमी, गोकुळाष्टमी, दहिहंडी, श्रावणी सोमवार या सणांबरोबरच उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा (Narli Pournima). समुद्रकिनारी राहणारे व समुद्राशी खूप जवळचा संबंध असणारे कोळी लोक हा सण खूप उत्साहाने साजरा करतात.
यंदाच्या वर्षीही या नारळीपौर्णिमेच्या सणाची जोरदार तयारी कोळी बांधवांनी सुरु केली आहे. त्यांनी आपापल्या होड्यांना रंगरंगोटी करुन सजवण्यास सुरुवात केली आहे. अगदी पूर्वीपासून ते आजतागायत चालत आलेली ही परंपरा ते अगदी आनंदाने जपत आहेत. पण याचे एक शास्त्रीय कारणदेखील आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाचा काळ. या काळात समुद्र खवळलेला असतो. तसेच हा माशांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे नारळीपौर्णिमेच्या काही दिवस अगोदरच कोळी बांधव समुद्रात जाणे, मासेमारी करणे बंद करतात. म्हणजेच निसर्गाचे रक्षण केले जाते.
या सणाला धार्मिक बाजूदेखील आहे. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरुण देव हा पश्चिम दिशेचा रक्षक असून त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करुन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. मासेमारीचा बंद केलेला व्यवसाय नारळीपौर्णिमेच्या दिवशी पुन्हा सुरु केला जातो. पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सागराची पूजा करुन व्यवसायाचा शुभारंभ केला जातो. नारळीपौर्णिमेच्या दिवशी मासेमारीचा शुभारंभ करताना होडीला रंगरंगोटी करुन सजवले जाते, पताका लावून सुशोभित केले जाते. आपल्या उदरनिर्वाहासाठी कामी येणार्या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची कोळ्यांची भावना यातून दिसून येते.
अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजर्या केल्या जाणार्या या सणाची लगबग मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील कोळीवाड्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. अशाच उत्साहात यंदाच्या नारळीपौर्णिमेसाठी कोळी बांधवांची लगबग सुरु झाली आहे. माहिम रेती बंदर, कोळीवाडा येथील काही कोळी बांधवांची होड्या सजवतानाची खास दृश्ये टिपली आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…