आता १५१५ रूपयांत करा विमान प्रवास, आलीये खास ऑफर

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमि्त (Independence Day 2023) इंडियन एअरलाईन्स स्पाईसजेटकडून एक शानदार ऑफर मिळत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही स्वस्तात हवाई यात्रेचा आनंद उठवू शकता. कंपनीने स्पेशल इनक्रेडिबल इंडिपेंडन्स डे सेल (special Incredible Independence Day sale) ची घोषणा केली आहे. हा सेल १४ ऑगस्टपासून सुरू झाला असून ही ऑफर २० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.


स्पाईसजेट सेलमध्ये तुम्ही केवळ १५१५ रूपयांमध्ये तुम्ही विमानप्रवासाचे तिकीट बुक करू शकता. तिकीटाच्या या किंमतीमध्ये सर्व प्रकारचे टॅक्स जोडलेले आहेत. यासोबतच तुमच्या आवडीचे सीट तुम्ही केवळ १५ रूपयांत निवडू शकता. सोबतच तुम्हाला २००० रूपयांचे तिकीट वाऊचरही मिळेल. जाणून घेऊया याबद्दल...



३० मार्च २०२४ पर्यंत


कंपनीने या सेलची माहिती आपल्या जुन्या ट्विटर हँडलवर दिली आहे. यात तुम्ही १५ ऑगस्टपासून पुढील वर्षी ३० मार्च २०२४ या कालावधीपर्यंतचे तिकीट बुक करू शकता. या ऑफर ऑफर सेलमधून कोणतेही प्रवासी अनेक ठिकाणी फिरू शकतात. या सेलमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत तिकीट तसेच अनेक लाभ मिळू शकतात. कंपनीने सांगितले की ते २००० रूपयांचे फ्लाईट व्हाऊचरही देत आहे. हे कॉम्प्लिमेंटरी वाऊचर असेल.






या ठिकाणी फिरण्याची संधी


१५१५ रूपयांता एका बाजूने प्रवासाची ऑफर आहे. मुंबई-गोवा, जम्मू-श्रीनगर, गोवा-मुंबई, गुवाहाटी-बागडोगरा, चेन्नई-हैदराबाद सारख्या प्रसिद्ध डोमेस्टिक रूट्सवर ही ऑफर दिली जात आहे. ही ऑफर डायरेक्ट डोमेस्टिक बुकिंग्सकडून एका बाजूच्या प्रवासावर व्हॅलिड आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ग्रुप बुकिंग्समध्ये याचा फायदा मिळणार नाही आणि याला दुसऱ्या कोणत्याही ऑफरसोबत जोडता येणार नाही.

Comments
Add Comment

Supreme Court : व्यभिचार सिद्ध झाल्यास पत्नी पोटगीस अपात्र, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : पत्नी व्यभिचारात राहत असल्याचे पतीकडून स्पष्टपणे सिद्ध झाल्यास, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५

India Envoy Warns Pakistan : "आधी दहशतवाद संपवा, आणि नंतरच..."!पाकिस्तानला भारताचा कडक इशारा; राजदूत विनय क्वात्रा यांचे स्पष्ट शब्द

नवी दिल्ली : पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारायचे असतील, तर सर्वप्रथम आपल्या भूमीवरील दहशतवादाचा संपूर्ण

Justice Anu Grover Baliga : न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलीगा यांची बदली, नीट पेपरफुटीची सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या प्रकरणांवरून आंदोलने झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

Delhi High Court : 'लंच ब्रेक'मध्ये झालेला अपघातही कामाचाच भाग, कर्मचारी भरपाईस पात्र

नवी दिल्ली : कर्मचारी भरपाई कायद्याची व्याख्या करताना उच्च न्यायालयाने एक अत

US Visa Bond Rule : ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय! आता US Visa साठी भरावा लागू शकतो १७ लाखांचा बॉण्ड

नवी दिल्ली : अमेरिकेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

Private Detectives : खासगी गुप्तहेरांवर येणार कायद्याचा वॉच! सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला मोठे निर्देश

नवी दिल्ली : देशभरात कार्यरत असलेल्या खासगी गुप्तहेर (Private Detectives) संस्थांवर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त