Drugs found at Murud beach : मुरुड समुद्रकिनार्‍यावर बेवारस पोत्यात आढळले तब्बल 'इतक्या' किंमतीचे ड्रग्ज

ड्रग्ज आलं कुठून?


रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनार्‍यावर (Murud beach) काल दुपारी चार वाजताच्या सुमारास एका बेवारस पोत्यामध्ये ४० लाख रुपये किंमतीचं चरस आढळल्याची एक खळबळजनक बाब समोर आली आहे. पोलिसांनी हे पोतं उघडून पाहिलं असता त्यात १,१५० ग्रॅम वजनाची १५ चरसची पाकिटे आढळून आली.


पोलियांना या पोत्यात अमली पदार्थ असल्याचा संशय होताच त्यामुळे पोलिसांनी जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथक मुरुडला दाखल झाल्यावर तपासणी करण्यात आली. त्यातून ही चरसचीच पाकिटे असल्याचं स्पष्ट झालं. पंचासमक्ष पंचनामा करून पाकिटे जप्त करण्यात आली.


पोलीस निरीक्षक आहिरे यांनी ही पाकिटे भिजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती दिली. अशाच प्रकारचे पाकीट सौराष्ट्र (गुजरात) समुद्रकिनारी मिळाले असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, मुरुडच्या समुद्रकिनार्‍यावर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आलं कुठून याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या