'गणेशोत्सवापूर्वी मुंबई -गोवा महामार्ग निर्धोक करा'

राज्यमार्गांनाही खड्डेमुक्त करा: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले निवेदन


मुंबई : गणेशोत्सवात गावात पोहोचायला हवे यासाठी चाकरमान्यांना वेध लागले आहेत.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट घेऊन मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीची गंभीरपणे नोंद घ्यावी.गावागावात जाणारे राज्यमार्गही खड्डेमुक्त व्हावेत यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याची मागणी केली आहे. तसे निवेदनही मुख्यमंत्र्यांना नारायण राणे यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कार्यवाही होणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले.


नारायण राणे निवेदनात म्हणतात, संपूर्ण कोकणपट्ट्यात उत्साहाने व आनंदाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. मुंबई व परिसरात नोकरी- व्यवसाय करणारे लाखो चाकरमानी कोणत्याही अडचणी न जुमानता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या गावांकडे धाव घेतात व त्यासाठी मुख्यतः मुंबई - गोवा महामार्गाचा (एन्- एच्. ६६) वापर करतात.


मुंबई-गोवा महामार्गाची सद्यस्थिती अतिशय दयनीय आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या महामार्गावर खड्ड्यांचे जाळे पसरले असून महामार्गाची चाळण झाली आहे. महामार्गाच्या या स्थितीमुळे राज्यभरातून कोकणात जाणा-या प्रवाशांचे हाल होणार असून अपघातही होऊ शकतात.


वरील परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व नंतर परतणाऱ्या प्रवाश्यांचा प्रवास विना अडथळा व सुरक्षिततेने पार पडावा या दृष्टीने गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी तातडीने मुंबई - गोवा महामार्गाची ( एन्. एच्. ६६) दुरुस्ती व सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत.अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली