महाराष्ट्रातील एक विख्यात नाट्यदिग्दर्शक, नाट्य अभ्यासक, नाट्य प्रशिक्षक पद्मश्री वामनराव केंद्रे व ज्येष्ठ अभिनेत्री गौरी केंद्रे यांचे सुपुत्र ऋत्विक केंद्रे सध्या अभिनयाच्या वाटेवर आहे. ऋत्विकचा जन्म दादरचा, तर शालेय शिक्षण कांदिवलीच्या चिल्ड्रन अॅकॅडमी शाळेमध्ये झाले. गायन, नृत्य, नाट्य स्पर्धेत तो हिरिरीने भाग घ्यायचा. घरातील वातावरण अभिनयाच्या क्षेत्राशी संबधित असल्याने त्याला मोठेपणी याच क्षेत्रात करिअर करावयाचे असे वाटले. पुढे विलेपार्लेच्या मिठीबाई कॉलेजमधून त्याने कला शाखेची पदवी संपादन केली. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक एकांकिकेमध्ये कामे केली.
कॉलेजचे शिक्षण संपल्यानंतर ऋत्विकच्या जीवनात एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आला. त्याला स्टार प्रवाह वाहिनीकडून ‘मानसीचा चित्रकार’ या मालिकेत काम करण्याविषयी विचारणा झाली. या मालिकेमध्ये त्याने विहंग दिगंबर नाईक ही व्यक्तिरेखा साकारली. ‘दिया और बाती हम’ या हिंदी मालिकेची ती मराठी रिमेक होती. अक्षया गुरव ही त्याची नायिका होती. त्या मालिकेमध्ये अतिशा नाईक, अभय कुलकर्णी, अमित फाटक, श्वेता मेहेंदळे हे इतर कलाकार होते.
त्यानंतर ऋत्विकला ‘सरगम’ नावाचा मराठी चित्रपट मिळाला. शिव कदम त्याचे दिग्दर्शक होते. ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्यासोबत काम करण्याची संधी या चित्रपटात त्याला मिळाली. गिरीशजींची त्यात डॉक्टरांची भूमिका होती. तो शहरात वाढलेला नायक होता, तर नायिका आदिवासी गावातील होती. त्यांच्यामध्ये नंतर प्रेम होते, अशी प्रेमकथा त्यात गुंफण्यात आली होती. दिशा परदेशी हिने नायिकेची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या कामाविषयी गिरीश कर्नाड यांची प्रतिक्रिया त्याला दिग्दर्शकांकडून कळाली. गिरीशजी त्यांना म्हणाले की, ‘या मुलाची तयारी खूप झालेली आहे. मलाही तयारी करावी लागणार आहे.’ तेव्हा उद्याचे सीन त्यांनी आजच मागवून घेतले. ही त्यांची प्रतिक्रिया त्याच्या कायमस्वरूपी लक्षात राहिली. कोल्हापूर फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट दाखविला गेला; परंतु अजून तो अधिकृतरीत्या प्रदर्शित झाला नाही.
ऋत्विकला त्यानंतर ‘ड्राय डे’ हा मराठी चित्रपट मिळाला. तीसुद्धा प्रेमकथा होती. संपूर्ण कथा एका रात्रीत घडणारी होती. हा चित्रपटही प्रदर्शित होऊ शकला नाही. त्याची अभिनयाची घौडदौड अशीच सुरू होती. त्यानंतर ‘बिंग अ फायर’ हा चित्रपट त्याने केला. त्यामध्ये त्याची नकारात्मक भूमिका होती. बिग बॉस फेम रुचिरा जाधव त्या चित्रपटामध्ये होती. हा चित्रपटही प्रदर्शित झाला नाही.
महाकवी भास यांनी लिहिलेल्या मध्यम व्यायोग या नाटकाचे वामनजींनी प्रिया बावरी (मराठी), मोहे पिया हिंदी), माय लव्ह (इंग्रजी) अशा तीन भाषांमध्ये नाट्य रूपांतर केले. एकाच दिवशी या नाटकाचे तिन्ही भाषांमध्ये प्रयोग करून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. महाभारतातील पांडव भीम व हिडिंबाची प्रेमकहाणी क्लासिक इंडियन फॉर्ममध्ये वामनजींनी सादर केली होती. हिडिंबाचा पुत्र घटोत्कच याची भूमिका ऋत्विकने साकारली होती. रंगपीठ या त्यांच्या संस्थेतर्फे व अनामिका निर्मित, साई साक्षी प्रकाशित ‘गजब तिची अदा’ हे नाटक सुरू आहे. दिनू पेडणेकर, श्रीकांत तटकरे, गौरी केंद्रे या नाटकाचे निर्माते आहेत. पद्मश्री वामनजी केंद्रे यांनी या नाटकाचे संगीत व दिग्दर्शन केले आहे. राजा आपले साम्राज्य वाढविण्यासाठी इतर देशांवर हल्ले करीत जातो. या लढाईत त्याचे सैन्यही मारले जाते. युद्धबंधी करण्यासाठी सैन्यांच्या बायका कोणती शक्कल लढवतात हे या नाटकात पाहायला मिळते. राजाच्या भूमिकेत ऋत्विकने अभिनयाचे विविध रंग भरले आहेत. अभिनयाची आवड, धाडसी खेळाची आवड, फिरण्याची आवड त्याने जोपासली आहे. ‘शून्यातून विश्व उभे कर, चिकाटी व संयम ठेव. जे काही करशील ते मनापासून कर, यश व अपयश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यश व अपयशचा लपंडाव जीवनात सुरूच राहतो त्यामुळे जीवनात कधीच खचून जाऊ नको’, हा कानमंत्र ऋत्विकला वडिलांकडून मिळाला आहे. या कानमंत्रावरच त्याची अभिनयाची वाटचाल सुरू आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…