Mega Block : मुंबईत उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

काही लोकल उशिराने, तर काही लोकल रद्द करणार


मुंबई : रुळ ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार १३ ऑगस्ट रोजी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे तिन्ही मार्गावरील काही लोकल उशीराने धावण्याची शक्यता असून काही लोकल रद्द करण्यात येतील.


मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल मुलुंड ठाणे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.


हार्बर मार्गावरील मानखुर्द नेरुळ स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी पनवेल, बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या व पनवेल, बेलापूर व वाशी स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मेगा ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्द स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर व मेन लाईन मार्गावरून प्रवासाची परवानगी दिली आहे.


पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकादरम्यान लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. विलेपार्ले व राम मंदिर स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

Comments
Add Comment

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो