Star Pravah Guinness World Record : अनोखा विक्रम! ब्लॉकबस्टर 'वेड'मुळे स्टार प्रवाहची नोंद गिनीज बुकात!

सुपरस्टार रितेश देशमुखचाही लागला हातभार... काय आहे हा विक्रम?


मुंबई : दर्जेदार मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनी (Star Pravah) लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. 'आपली मराठी परंपरा, मराठी प्रवाह' अशी टॅगलाईन आता प्रत्येक घरातून ऐकू येऊ लागली आहे. याच स्टार प्रवाह वाहिनीने आता 'वेड' (Ved movie) चित्रपटाच्या माध्यमातून एक नवा विक्रम रचला आहे. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर वेड चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर (World Television Premier) होणार आहे. याच निमित्ताने सुपरस्टार रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांच्या उपस्थितीत हा अनोखा विक्रम रचण्यात आला.


वेड चित्रपटातील सत्या आणि श्रावणी या मुख्य पात्रांनी प्रेक्षकांना वेडं करुन सोडलं आहे. केवळ गाणीच नाही तर चित्रपटाची कथाही प्रेक्षकांना तितकीच आवडली. यातील मुख्य जोडप्याचं छत्रीसोबत एक विशेष नातं आहे. याच गोष्टीमुळे प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती छत्र्यांच्या साहाय्याने साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला. मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १ हजार ४४६ छत्र्यांचा वापर करण्यात आला. या प्रत्येक छत्रीवर स्टार प्रवाहचा लोगो छापण्यात आला होता. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली. रितेश देशमुख यांनी या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record ) पूर्णत्वास नेला.





स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जेनेलिया आभारी आहोत अशा शब्दांत रितेश देशमुख यांनी भावना व्यक्त केली. तर स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) म्हणाले, ‘मराठी सिनेमा हा प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वेड सिनेमाने प्रेक्षकांना खरंच वेड लावून दमदार कमाई केली ही या सिनेमाची ताकद आहे. स्टार प्रवाह वाहिनी मराठी परंपरा राखण्याचा कायम प्रयत्न करते आणि म्हणूनच स्टार प्रवाह या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राचा नंबर वन सिनेमा २० ऑगस्टला घेऊन येतोय. या सिनेमासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस रचत स्टार प्रवाह याअग्रगण्य वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरलं आहे.’



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Lock Upp : 'लॉक अप सीझन २'ची विजेती श्रेया कालराचा मोठा निर्णय; १ कोटींच्या प्राइझ मनीबाबत केली मोठी घोषणा

ओटीटीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'लॉक अप सीझन २'चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. बुधवारी झालेल्या

Saif Ali Khan : ५० व्या वर्षीही अविवाहित असलेली सैफ अली खानची बहीण सबा पटौदीचा लग्नाबद्धल मोठा खुलासा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांची मोठी बहीण सबा पटौदी (Saba Pataudi) नेहमीच

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या

Amitabh Bachchan : "शूट चुकवलं असतं तर माझी..."; KBC साठी सलग २४ तास काम! ८३ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांच्या जिद्दीला सलाम

मुंबई : वयाच्या ८३व्या वर्षीही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त

Salman Khan : सलमान खानवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप! ‘बीइंग ह्युमन’ ज्वेलरी प्रकरणात कोर्टाचे समन्स; जाणून घ्या ३ कोटींच्या गुंतवणुकीचा वाद नेमका काय?

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे ‘बीइंग ह्युमन’ (Being Human)

Ted Sarandos Meets PM Modi : Netflix ची भारतासाठी मोठी घोषणा! देश बनणार ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’; टेड सारंडोस यांनी घेतली PM मोदींची भेट

नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य