Dr. Babasaheb Ambedkar statue : इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्याला मान्यता

राम सुतार यांच्या शिल्पशाळेतील २५ फुटांच्या प्रतिकृतीला मंजुरी


मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्यासाठी गाझियाबाद येथील राम सुतार यांच्या शिल्पशाळेतील २५ फुटांच्या प्रतिकृतीला राज्य सरकारने गुरुवारी अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रतिकृतीच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा भव्य पुतळा साकारला जाणार आहे.




  • इंदू मिल येथील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ नोव्हेंबर २०२२ रोजी बैठक झाली होती.

  • या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व्यक्तींना सोबत घेऊन गाझियाबाद येथील राम सुतार यांच्या शिल्पशाळेतील २५ फुटांच्या प्रतिकृतीची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

  • त्यानुसार ६ एप्रिल २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत राम सुतार यांच्या शिल्पशाळेला भेट देऊन तेथील २५ फुटांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती पुतळ्याची पाहणी करण्यात आली.

  • या पाहणीदरम्यान मान्यवरांकडून २५ फुटी पुतळ्याच्या प्रतिकृतीला सहमती देण्यात आली होती. या प्रतिकृतीच्या धर्तीवर इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली. यासंदर्भात राज्य सरकारने गुरुवारी शासन निर्णय जारी केला.


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईकरांच्या सेवेत १८ डब्यांची लोकल लवकरच!

विरार-डहाणू रोड सेक्शनवर १४-१५ जानेवारीला चाचणी मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरून प्रवास

महापौर, गटनेते, अध्यक्ष यांच्या दालनाच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

येत्या १५ दिवसाच्या आत सर्व दालने सुस्थितीत करून ठेवा, असे दिले निर्देश मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या

मुंबईत २०२६ च्या अखेरीस सुरू होणार जोगेश्वरी टर्मिनस

मुंबई : मुंबईत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनस, कुर्ला टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे

Santosh Dhuri on Raj Thackeray : "राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर, मनसेवर आता उद्धव ठाकरेंचा ताबा!"; भाजप प्रवेशानंतर संतोष धुरींची पहिलीच डरकाळी

मुंबई : मुंबईच्या राजकारणात मंगळवारी मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) फायरब्रँड नेते आणि

Nitesh Rane : "उद्धव ठाकरे नाही, तर ते 'उद्धव वाकरे'...नितेश राणेंचा घणाघात!

अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या विधानामुळे राणे आक्रमक मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या

बनावट एबी फॉर्मचा आरोप न्यायालयात; सायन कोळीवाडा वादावर उच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार

मुंबई : महापालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर सायन कोळीवाडा मतदारसंघातील वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात