Cristiano Ronaldo: इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक कमाईत रोनाल्डोची हॅटट्रीक

Share

रोनाल्डो प्रति इन्स्टाग्राम पोस्टमधून ३.२३ अमेरिकन डॉलर कमावतो.                            फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. रोनाल्डो हा सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोनाल्डो प्रति इन्स्टाग्राम पोस्टमधून ३.२३ अमेरिकन डॉलर कमावतो. ही मोठी रक्कम मिळण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर या दिग्गजाचे जवळपास ६०० दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. यादीतील त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेला अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी सुमारे २.६ दशलक्ष कमावतो.

इन्स्टाग्रामवर विराट एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय                              इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीयांसह आशियाई व्यक्तींच्या यादीत स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या स्थानी आहे. विराटला एका पोस्टमधून ११.४० कोटी रुपये मिळतात. तर जगभरातील खेळाडूंमध्ये त्याचा क्रमांक तिसरा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विराट एका इंस्टाग्राम पोस्टवरून जवळपास ११.४५ कोटी रुपये कमावतो. इन्स्टाग्रामवर कोहलीचे २५.६ कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सार्वत्रिक यादी पाहता विराट कोहलीचा १४वा क्रमांक आहे.

इन्स्टाग्राम अकाउंटवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा तो पहिला आशियाई आहे. आशियातील इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेल्या लोकांच्या यादीत इस्रायलची अभिनेत्री गॅल गॅडोट १०३ दशलक्षसह दुसऱ्या स्थानावर आहे. थायलंडची संगीतकार लिसा ९४ दशलक्षसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

5 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

5 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

5 hours ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

5 hours ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

5 hours ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

5 hours ago