नवी दिल्ली : विरोधकांच्या आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना काल लोकसभेच्या सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आज राज्यसभेतून विरोधकांच्याच आघाडीतील घटक पक्ष ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर ‘आप’चे दुसरे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनाही राज्यसभेतून निलंबित करण्यात येईल, असं राज्यसभेकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यसभेतील पाच खासदारांच्या नावांचा उल्लेख परवानगीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर केल्याने आपचे खासदार राघव चढ्ढा यांना निलंबित करण्यात आले आहे. या पाच खासदारांनीच तसा दावा केला आहे. भाजपचे तीन खासदार, बीजेडी आणि एआयएडीएमकेचे एक खासदार अशा पाच जणांनी निषेध नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
हा वाद चव्हाट्यावर येताच राज्यसभेच्या उपसभापतींनी याची चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. या पाच खासदारांमध्ये सस्मित पात्रा (BJD), नरहरी अमीन (BJP), सुधांशू त्रिवेदी (BJP), नागालँडचे खासदार फांगनॉन कोन्याक (BJP) आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई यांचा समावेश आहे. थंबीदुराई हे AIADMK खासदार आहेत.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संजय सिंह यांना संसदेच्या संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून निलंबित केलं आहे. आता विशेषाधिकार समितीची चौकशी होईपर्यंत संजय सिंह यांनाही राज्यसभेतून निलंबित करण्यात येईल, असं राज्यसभेकडून सांगण्यात आलं आहे. राज्यसभेतील नेते पियुष गोयल यांनी संजय सिंह यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ते आवाजी मतदानानं मंजूर झालं.
संजय सिंह यांना ‘अशोभनीय वर्तन’ केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. खरं तर मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या मागणीवर विरोधक ठाम होते. तेव्हा सभापती जगदीप धनखड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा केली जाईल, असं सांगितले. मात्र, प्रश्नोत्तराचा तास काही मिनिटंच चालला. यानंतर संजय सिंह सभापतींच्या खुर्चीजवळही आले. अध्यक्षांनी त्यांना परत जाण्यास सांगितलं. मात्र ते सिंह यांनी ऐकलं नाही. त्यानंतर पीयूष गोयल यांनी त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. तो मंजूर झाला होता.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…