fake labs: बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब

  81

राज्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळ, राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड


बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब सुरु करुन रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार मुक्तविद्यापीठाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ! बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब, राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड शिक्षण आणि नागरिकांच्या आरोग्या संदर्भातील खळजबळजनक बातमी समोर आली आहे. बनावट मार्कशीट आणि सर्टिफिकेट बनविण्याचे लोण आता मुक्त विद्यापीठापर्यंत (Open University) येऊन पोहोचले आहे. बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब (Pathology Lab) सुरु करुन रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार मुक्त विद्यापीठाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी चार एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर, 20 विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे.


रुग्णांच्या जीवाशी खेळ!                                                                           कुठल्याही मोठ्या आजाराचे निदान करायचे असल्यास पॅथॉलॉजी लॅबमधून (Pathology Laboratory) विविध चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टराकडून दिला जातो. आपणही डोळे झाकून संबंधित लॅबकडे जाऊन चाचण्या करून घेतो. ह्या पॅथॉलॉजी लॅब पात्रताधारक तंत्रज्ञांकडून चालवली जाते की नाही, याचा विचार कोणी करत नाही. मात्र, आता हा विचार करण्याची वेळ आली आहे. पॅथॉलॉजी लॅब सुरु करणासाठी बनावट कागदपत्रं तयार करून देणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश पॅरामेडिकल कॉन्सिल (पॅरावैद्यक परिषद) आणि मुक्त विद्यापीठाने केला आहे.


बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब
सन 2020-21 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत यवतमाळ, ठाणे, जळगाव, अहमदनगर, मनमाड अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या 20 विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे बीएससी एमएलटी आणि डीएमएलटी या पदव्यांचे मुक्त विद्यापिठाच्या नावाचे बनावट मार्कशीट, सर्टिफिकेट तयार केले होते. लॅब सुरु करण्याची मान्यता घेण्यासाठी पॅरामेडिकल काउन्सिलकडे अर्ज करण्यात आला होता.


राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड
संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी काउन्सिलने मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विचारणा केली असता असे विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतं नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. यानंतर विद्यापीठाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी केली असता विद्यापीठचे बनावट सही, शिक्के याच्या माध्यमातून बनावट गुणपत्रक, प्रमाणपत्रक तयार केल्याचं निदर्शनास आला आहे.


बनावट कागदपत्र प्रकरणी 20 विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस
चौकशी समितीने 20 विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस पाठवून बनावट कागदपत्रे कोणाकडून घेतली याबाबतीत चौकशी सुरु केली असता साधारण 14 जणांच्या चौकशीत काही नाव समोर आली आहेत. त्यापैकी नागपूरचा गौरव शिरसकर, सातारचा रमेश होनामोरे,अहमदनगरचा अशोक सोनवणे आणि नांदगावचा संजय नायर यांची नाव समोर आली असून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना होणार आहे.


चार जणांवर गुन्हे दाखल, अधिक तपास सुरु
ज्या 20 विद्यार्थ्यांच्या नावे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले आणि ज्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा आणि विद्यापीठाचा आजवर कधीच संबंध आला नसल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचे सही, शिक्के संशयित एजंटपर्यंत कसे पोहचले, असा सवाल उपस्थित होत आहे. विद्यापीठातील कोणी या कारस्थानात गुंतले आहे का, असा संशय देखील व्यक्त केला जात असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास केला जाणार आहे.


पॅरा वैद्यकीय परिषद आणि मुक्तविद्यापीठाच्या सतर्कतेमुळे एक गुन्हा उघडकीस आला आहे. आता प्रमाणपत्र तयार करताना विशेष खबारदारी घेतली जात असून क्यू आर कोड, बार कोडसह 15 वेगवेगळे सुरक्षाचे मापदंड नवीन प्रमाणपत्राना देण्यात आले आहेत. त्यामुळे खोटे दाखले प्रमाणपत्र तत्काळ उघडकीस येतील. मात्र इतरही विद्यापीठातून अशा स्वरुपाचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले असतील तर त्याचा तपास व्हावा या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यात आल्यानं तपासासत काय निष्पन्न होते, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

'३ ऑक्टोबर' हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' व 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' प्रतिवर्षी साजरा करणार

मराठी-हिंदी वाद सुरू असताना महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय झाला जाहीर मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने पाच जणांना चिरडले; २ ठार, ४ जखमी

छत्रपती संभाजीनगर: आज सकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात एक भीषण अपघात घडला. सिडको एन-१ परिसरातील काळा गणपती

Eknath Shinde: 'जय गुजरात...'; पुण्यातील कार्यक्रमात एकनाथ शिंदेंची शहांसमोर घोषणा

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना