मुंबई : आज दिनांक ९ ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारंपारिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने विधान भवनाचा परिसर दुमदुमून गेला. आदिवासी समाजाचे नेते तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतून आलेल्या आदिवासी बांधवांसमवेत पारंपरिक नृत्य आणि गायनात सहभागी झाले.
विधान भवनाच्या प्रांगणात त्यांनी आदिवासी नृत्यांवर ठेका धरला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी विधानसभा सदस्य राजू तोडसाम यांनी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे आणि क्रांतिवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले. यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सर्व मान्यवरांचे तसेच अधिकारी वर्गाचे पारंपारिक आदिवासी पध्दतीने तसेच क्रांतिवीरांच्या मूर्ती भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव-२ ( कार्यभार) डॉ. विलास आठवले उज्वला शिंदे डॉ माणिक पानगव्हाणे यांच्यासह महाराष्ट्र विधानमंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…