मुंबई : रेल्वे नंतर मुंबईकरांची पसंती असलेली वाहतूक सेवा म्हणजे बेस्ट बसच्या (BEST Bus) कंत्राटी कामगारांचा सलग सहाव्या दिवशी आणि आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील संप (BEST Bus Strike) कायम आहे.
अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नसल्याने बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यामुळे मुंबईतील बेस्टची बस सेवा विस्कळीत झाली आहे.
बेस्ट प्रशासन किंवा राज्य सरकारकडूनही अद्याप यावर कोणतीही बैठक आयोजित करून चर्चा झालेली नाही. आज यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मालाड येथे कंत्राटी कामगारांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तेथे बेस्ट कडून मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायमस्वरूपी चालक व वाहक भाडेतत्त्वावरील बसेस चालवत असल्याने कंत्राटी कामगार त्यांना रोखून धमकावत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…