एसआरएचच्या मुख्य प्रशिक्षकपदी डॅनियल व्हिटोरी

  250

हैदराबाद (वृत्तसंस्था) : सनरायझर्स हैदराबादच्या (एसआरएच) नव्या हेड कोचची घोषणा सोमवारी करण्यात आली. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीची एसआरएचचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. ब्रायन लारासोबतचा संघाचा दोन हंगामांचा करार संपुष्टात आला.


न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी आमच्या संघ एसआरएचमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झाल्याची माहिती एसआरएचने ट्विटरद्वारे दिली. व्हिटोरी दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. यापूर्वी २०१४ ते २०१८ पर्यंत व्हिटोरीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रशिक्षकपद भूषवले होते.


एसआरएचने म्हटले की, लाराने सनरायझर्ससाठी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद. तुमच्या भविष्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आयपीएल २०२३ च्या आधी लाराने टॉम मूडींची मुख्य प्रशिक्षक म्हणून जागा घेतली. वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू आयपीएल 2022 दरम्यान SRH मध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला होता.


आयपीएलमध्ये यंदा तीन नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. व्हिटोरीच्या आधी लखनऊ सुपर जायंट्सने ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची नियुक्ती केली आहे. त्याच वेळी, आरसीबीने त्यांचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवरची निवड केली.

Comments
Add Comment

ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन