आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. रणवीर – आलियाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनकरिता रणवीर-आलिया आणि करण जोहर हे मुंबईतील एका थिएटरमध्ये गेले. अचानक तिथे जाऊन त्यांनी चाहत्यांना सरप्राईज दिले. आता या तिघांचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये आलिया आणि रणवीर स्वत: आल्याचे प्रेक्षकांना समजताच सर्वजण आपापल्या जागेवरून उठताना दिसत आहेत. लोकांनी त्या दोघांसोबत फोटो काढले. तसेच या दरम्यान आलियाने प्रेक्षकांना प्रश्न विचारला की, कसा आहे चित्रपट? त्यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रणवीर-आलियाने हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. रणवीर सिंह आणि आलिया भट्टा यांचा हा चित्रपट काही नेटकऱ्यांना आवडला असून त्यांनी दोघांच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले आहे.
करण जोहरने सात वर्षांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचे कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे.
हा चित्रपट परस्परविरोधी व्यक्तिमत्त्व असलेल्या जोडप्यावर आधारित आहे, जे प्रेमात पडतात आणि लग्न करण्यापूर्वी तीन महिने एकमेकांच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतात. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…