रवींद्र तांबे
कोकणात(Konkan) पाऊस पडल्यावर चार ते पाच दिवसांत माळरान, डोंगर हिरवेगार दिसतात. त्यात विविध प्रकारची झाडे असतात. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या हालत असल्यामुळे अधिक हिरवळ उठावदार दिसते. त्यामुळे पाहणाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यात बैल, गाई, म्हशी व वासरे चरताना पाहून एक वेगळा आनंद मिळतो. घाटातून गाडी जाताना घाट हिरवागार दिसतो. त्यात फेसाळणाऱ्या धबधब्याचे दर्शन होते. त्यासाठी कोकण(Konkan) विभागात भटकंती करायला यावे लागेल.
उन्हाळ्यात कोरडे असणारे नद्यानाले मुसळधार पावसाच्या गढूळ पाण्याने दुथडी भरून वाहत असताना दिसतात. ते पाण्याचा रुद्रावतार धारण करून खळखळ आवाज करीत. त्यामुळे मुंबईहून कोकणात राष्ट्रीय महामार्गाने जात असताना काहीसा उजव्या बाजूला असणारा अरबी समुद्र खवळलेला दिसतो. उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे मरणाच्या दारात आलेली झाडे पावसाच्या आगमनाने पुन्हा ताजीतवानी होतात. झाडांना नवीन पालवी फुटते. तसेच नवीन झाडे सुद्धा उगवतात. त्यामुळे पावसाळ्यात घनदाट जंगल दिसते. अशा या घनदाट जंगलामुळे कोकणात(Konkan) शुद्ध हवा मिळते. नेहमीच दूषित हवेचा सामना करणारे लोक या वातावरणात आल्यावर मोकळ्या वातावरणात आल्याचे जाणवते. इतकेच काय त्यांना जर खोकला किंवा अशक्तपणा वाटत असेल तर या शुद्ध हवेत आल्यावर बरे वाटते. इतकी नैसर्गिक ताकद कोकणच्या हवेत आहे. यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची वाढती संख्या दिसून येते.
विशेष म्हणजे, कोकणात पावसाळ्यात शेती केली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात ओसाड दिसणाऱ्या कोपऱ्यात नांगरणी केल्याने त्यात अंगभर पाणी ठेवल्याने लांबून शिल्प कोरल्यासारखे वाटतात. त्यात लावणी लावल्यानंतर कोपरे अधिक शोभून दिसतात. कोकणात शेतीचा विचार करता हल्ली बऱ्याच ठिकाणी शेती कमी प्रमाणात केली जात असली तरी खरे सौदर्य शेतीमुळे दिसून येते. रानभाज्या, वेली त्यावर रंगीबेरंगी फुले शोभून दिसत असल्याने पर्यटकांना अधिक आनंद होतो. कारण अशी फुले फळे कृत्रिम पाहणाऱ्या व्यक्तीला साहजिकच नवल वाटणार हे मात्र निश्चित. हीच खरी कोकणची ओळख आहे. कोकणात राज्यातील इतर विभागांच्या तुलनेने जास्त पाऊस पडतो. बऱ्याच वेळा हिरव्यागार माळरानावर असताना संध्याकाळच्या वेळेला ऊनपावसात इंद्रधनुष्य दिसल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित होतो. त्याचप्रमाणे लहान मुले सुद्धा आनंदाने नाचू लागतात.
पावसाळ्यातील पहिल्या सुरुवातीला गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना थंडावा मिळतो. नंतर एक/दोन महिने होतात त्याप्रमाणे त्यात बदल होऊन सुखावले जातात. मात्र खरा निसर्ग ऑगस्ट महिन्यात बहरतो यामध्ये रान मळ्यात विविध फुले उमलतात. हिरव्यागार मळ्यात फुले वाऱ्यामुळे डोलत असल्याने लांबून पाहताना खूप समाधान वाटते. यामुळे खरे निसर्गाचे रूप दिसते. यात अल्ली अधून मधून पाऊस पडत असला तरी पावसाळ्यातील चार महिने पाऊस मुसळधार पडल्याने झऱ्याचे पाणी वाहू लागते. त्यात ठिकठिकाणी असलेले धबधबे वाहत असल्याने पर्यटक अधिक आकर्षित होतात. त्यात आंगोळ करणे एक वेगळीच मजा असते. हे जे नैसर्गिक सौंदर्य निसर्गाने कोकणाला दिले आहे ते पाऊस सौंदर्य टिकविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत असतो. यासाठी अभ्यासक मंडळीही येत असतात. कोकणातील जमीन, नैसर्गिक झरे, रानभाज्या, रानटी औषधे, झाडांची ओळख, गवताचे प्रकार, हिरवा पाला, वेगवेगळे दगड, त्यात जांभा दगड अधिक आकर्षक दिसतो इत्यादी विषयी कोकण परिसरातील जाणकार माणसांशी बोलून माहिती घेतात. त्यानंतर त्याचा इतिहास आपल्या लेखणीतून देशा समोर मांडतात. त्यामुळे कोकणाची शान अधिक वाढली जाते. सध्या देश-विदेशातून लोक कोकणचे नैसर्गिक सौंदर्य पावसाळ्यात बघायला येतात. विदेशी पर्यटक समुद्राकाठी जाणे अधिक पसंत करतात. कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ व तपकिरी दिसणाऱ्या वाळूवरून फिरायला खूप मजा येते. यासाठी ओटीची वेळ अतिशय महत्त्वाची असते. जास्त पाऊस असल्यास पर्यटक हॉटेलमध्ये राहाणे पसंत करतात. कोणत्याही प्रकारचा धोका घेत नाहीत.
सध्या कोकणात नद्यानाले भरून वाहत आहेत. त्यात रस्त्यावर दरड कोसळणे किंवा फुलावरून पाणी जाणे त्यामुळे शक्यतो पर्यटकांनी शासकीय नियमांचे पालन करावे. हल्ली सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मागील महिन्यामध्ये दरड कोसळल्याने रायगड जिल्ह्यातील ईशाळवाडीवर नैसर्गिक संकट आलेले होते त्याची आपणा सर्वांना कल्पना आहे. त्यात अनेक निरपराध नागरिकांना व मुक्या जनावरांना आपल्या जीवाला मुकावे लागले होते.
कोकण पर्यटकांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. आतापर्यंत अनेक पर्यटक कोकणात आले. मात्र कोणत्याही प्रकारे त्यांच्यावरती नैसर्गिक संकट किंवा लुटमार झाल्याचे उदाहरण नाही. काही ठिकाणी किरकोळ दंगे झाले. त्याला अति उत्साहाचे फळ गवसे पर्यटकांना मिळाले आहे. त्याला तेच जबाबदार आहेत. तेव्हा कुठेही गेले तरी शिस्तीचे पालन अतिशय महत्त्वाचे असते. मागील दोन आठवडे वरुणराजाने पावसाचा धुमाकूळ घातला होता. आता थोडी विश्रांती घेतली आहे. यात कोकण निसर्गसौंदर्याने
बहरलेले आहे. त्यामुळे एकदा कोकणात गेल्यावर पुन्हा केव्हा एकदा पावसाळा येतो आणि मी कोकणात जातो असे तुम्हाला वाटेल.
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…