बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून टप्पा वाहतूक करण्यास परवानगी

Share

शासनाची अधिसूचना जारी

मुंबई : विविध मागण्यांसाठी बीईएसटी (बेस्ट ) कामगार ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक ३ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारल्याचे निदर्शनास आले आहे. या संपामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यास्तव प्रस्तावित आंदोलनाच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून उदा. सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, स्कूल बस आदींमधून प्रवाशांच्या वाहतुकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे. अशा प्रकारची अधिसूचना राज्य शासनाने जारी केली आहे.

मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९८८ च्या ५९) चे कलम ६६ थे उपकलम (३) च्या खंड (एन) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने ही अधिसूचना जारी केली आहे.

अधिसूचनेद्वारे मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून (पी एस व्ही सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस, स्कूल बसेस आदींमधून प्रवाशांच्या वाहतुकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास शासन परवानगी देत आहे. संप मागे घेतल्यास सदर अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असे गृह (परिवहन) विभागाचे कार्यासन अधिकारी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

1 hour ago

आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…

2 hours ago

Belly Fat: १५ दिवसांत बाहेर निघालेले पोट होईल कमी, वापरा हे उपाय

मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…

3 hours ago

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

12 hours ago

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त वयाची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवली

कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…

12 hours ago

तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले! विराट कोहलीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…

13 hours ago