Ganesh idols price : 'या' कारणामुळे गणेशमूर्ती ३० टक्क्यांनी महागणार

मात्र भाविकांचा उत्साह कायम...


नंदुरबार : गणेशोत्सवाला (Ganeshotsav) अवघा दीड महिना राहिल्याने विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु केली आहे. गणेशमूर्ती (Ganesh Idols) साकारणार्‍यांचे कामही जोरात सुरु आहे. कोरोना काळात असलेले निर्बंध आणि गणेश मूर्तींच्या उंचीवरील मर्यादा यामुळे गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांवर मोठ्या आर्थिक संकट आले होते. यंदा गणपती मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा उठवल्याने मोठमोठ्या मूर्तींनाही प्रचंड मागणी आहे. मात्र मूर्ती बनवण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने यंदा गणेशमूर्तींची किंमत ३०% ने वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी भाविकांमधील गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे.


पेणमध्ये साकारल्या जाणार्‍या गणेशमूर्तींना राज्यातच नव्हे तर परदेशातही मागणी असते. पेणनंतर नंदुरबारच्या (Nadurbar) गणेशमूर्तींना बाजारात मोठी मागणी असते गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागात नंदुरबारमधून गणेश मूर्ती जात असतात. नंदुरबार शहरात गणेश मूर्ती बनवणारे लहान मोठे १०० कारखाने असून हजारो गणेश मूर्ती साकारल्या गेल्या आहेत. सात इंचापासून २२ फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या असून यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र या वाढीमुळे लहान मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा काही प्रमाणात हिरमोड होत आहे.


आणखी एक विशेष बाब म्हणजे, गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे ४ फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुटांपेक्षा कमी असलेल्या मूर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना 'एक खिडकी' पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून