रुद्रप्रयाग : राज्यात पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी उत्तर भारतात (North India) मात्र पावसाचे थैमान (Heavy rainfall) सुरुच आहे. पूरसदृश परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यातच गौरीकुंडमध्ये (Gaurikund) सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे उत्तराखंड (Uttarakhand) येथील रुद्रप्रयाग (Rudraprayag) जिल्ह्यात पुन्हा एकदा भूस्खलनाची (landslide) घटना घडली आहे. दरड कोसळल्याने सुमारे १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. रुद्रप्रयाग पोलिस, एसडीआरएफ (SDRF), डीडीआरएफसह (DDRF)अनेक पथके बचावकार्यात गुंतली आहेत, मात्र टेकडीवरून सतत दगड कोसळत असल्याने बचाव पथकाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.
गुरुवार संध्याकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावर दरड कोसळून दोन दुकानांचे नुकसान झाले. दुकानात काम करणारे सुमारे १३ लोक ढिगाऱ्याखाली दबले. भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफ आणि डीडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. आणि बचावकार्य सुरू केले. मात्र बेपत्ता लोकांबद्दल अजून माहिती मिळू शकलेली नाही. मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचीही सुटका होऊ शकली नाही. यातील काही लोक स्थानिक तर काही नेपाळमधील आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास डाक पुलियाजवळ भूस्खलन झाले. माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्य थांबवावे लागले. आता सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाने एक यादी जारी केली असून त्यात १३ जणांची नावे आहेत. मात्र, हे लोक बेपत्ता आहेत की नदीत वाहून गेले आहेत की ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…