मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जागी अजित पवार (Ajit Pawar) येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्याबाबत स्वतः शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा खुलासा करुन या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात होण्याचे कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव असलेल्या खुर्चीत थेट अजित पवार यांनाच बसवले. यामुळे उपस्थितांमध्ये दबक्या आवाजात अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे
मुंबईत आज मनोरा या आमदार निवासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे आणि इतर आमदार, मंत्र्यांना निमंत्रण होते.
मात्र काही कारणास्तव मुख्यमंत्री शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाहीत. त्याचवेळी व्यासपीठावर अजित पवार यांची एन्ट्री झाली. त्यांनी सर्वत्र नजर टाकली. मात्र त्यांची खुर्ची त्यांना दिसली नाही. अजित पवार यांची खुर्ची नसल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची शेजारी बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरील स्टिकर काढत अजित पवार यांना त्या खुर्चीत बसवले. नार्वेकरांची ही कृती पाहुन फडणवीस यांनीही स्मितहास्य करत अजित पवार यांच्या दिशेने पाहिले.
राजकारणात संकेत आणि टायमिंग या गोष्टींना खूप महत्वाचे मानले जाते. मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, उपमुख्यमंत्री असूनही अजित पवार यांची खुर्ची नसणे आणि त्याच खुर्चीवर अजित पवार यांना बसवणे अशा घडामोडींमुळे पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…