कन्नमवारनगर, विक्रोळी (पू.) येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्या इमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात – मंत्री उदय सामंत

मुंबई : कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले होते, त्यानुसार म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या महिन्याभरात संबंधित कामाची निविदा काढण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


सदस्य सुनील राऊत यांनी कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतीवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते.


मंत्री श्री.सामंत म्हणाले की, महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या वास्तुविशारद सल्लागाराने सादर केलेल्या आराखड्यास म्हाडा प्राधिकरणाची मंजुरी, तसेच वृक्ष प्राधिकरण, पर्यावरण व वन मंत्रालय यांची ना-हरकत मिळण्यासह प्रस्तावित रुग्णालय आणि कर्मचारी सेवा निवासस्थानाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरु असून येत्या महिन्याभरात या बाबतची निविदा काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे येत्या तीन वर्षांत रुग्णालयाचे काम पूर्ण केले जाईल, असे श्री.सामंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

गोरेगाव भागात मंगळवारी राहणार पाणीकपात

उड्डाणपुलाच्या मार्गातील ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वळवणार मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके

मुंबईतील सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत तीन प्रभाग भाजपकडे

मुंबई : मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सहा समित्यांच्या निवडणूका

मुंबईत २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास, १० लाख परवडणारी घरे बांधणार - वडाळ्यात 'तिसरी मुंबई' आकाराला येणार

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर ; वडाळ्यात जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप हब', मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा

Hawker : पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा उपलब्ध करून देणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च

अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेवर शिक्कामोर्तब; योजना पुढेही...

मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध

Mumbai ATS Raid : दहशतवादी संघटनांशी संबंध, मुंबईत अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक

मुंबई : दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २१