बीजिंग : मुसळधार पावसामुळे चीनमध्ये (China) भीषण पूरस्थिती निर्माण झाली असनू राजधानी बीजिंगमधील (Beijing) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. चीनमध्ये १४० वर्षांनंतर भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील स्थानिक माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. तर, ५२,००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
सलग चौथ्या दिवशी पावसाची कोसळधार पाऊस सुरू असल्याने राजधानी बीजिंगसह अनेक मोठी शहरे पाण्याखाली गेली आहेत.
बीजिंग हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ७४४.८ मिमी पावसामुळे वांगजियायुआन जलाशय भरले आहे. पावसामुळे आतापर्यंत २० जणांना जीव गमवावा लागला असून २७ हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. द गार्डियन वृत्तपत्राने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्व स्थानिक प्रशासनांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. लिओनिंगमध्ये पूरग्रस्त भागातून सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यापूर्वी 1998 मध्ये चीनमध्ये भीषण पूर आला होता. ज्यामध्ये ४२०० लोकांचा मृत्यू झाला. यांगत्झी नदीच्या पुरामुळे बहुतेकांचा मृत्यू झाला. तर २०२१ मध्ये हेनान प्रांतात आलेल्या पुरात ३०० लोकांचा मृत्यू झाला होता.
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…