Sambhaji Bhide : संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल... पण विधानसभेत गदारोळ

यशोमती ठाकूर यांना सुरक्षा देणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती


मुंबई : देशाच्या महानायकांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे जनतेच्या व राजकारण्यांच्या प्रचंड रोषाचा सामना करत असलेले शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर २९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तरीही या प्रश्नासंदर्भात आज विधानसभेत (VidhanSabha) गदारोळ झाला. गेले काही दिवस भिडेंच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंबंधी विधानसभेत बोलताना माहिती दिली.


देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान १५३ (अ), ५००, ५०५ (२), ३४ तसेच म.पो.का सह कलम १३५ अन्वय २९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माध्यमांमध्ये जे विविध व्हिडिओ फिरत आहेत त्यांचे व्हॉईस सॅम्पल घेऊन त्याची तपासणी करण्यात येईल. जितेंद्र आव्हाड यांनी जी तक्रार केली आहे ती अमरावती पोलिसांकडे पाठवली आहे. संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम करतात पण त्यांना महापुरुषांवर वादग्रस्त विधानं करण्याचा अधिकार नाही असंही यावेळी फडणवीस म्हणाले.


अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना देण्यात आलेल्या धमकीमुळे विधानसभेत त्या आक्रमक झाल्या होत्या. उद्या काही बरंवाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीसांनी यशोमती यांना सुरक्षा दिली जाईल व धमकी देणार्‍या व्यक्तीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असे स्पष्ट केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC : महापालिका शीव रूग्णालयात डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्या; महापालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांचे निर्देश

रूग्णालय कर्मचारी उपस्थिती पडताळणीसाठी एआयचा वापर करण्याचेही

Sarbananda Sonowal : ‘ई-समुद्र’ डिजिटल मंचाचा शुभारंभ; सागरी प्रशासनाच्या डिजिटायझेशनकडे भारताची मोठी झेप

मुंबई : भारताने सागरी प्रशासनाच्या डिजिटायझेशनच्या दिशेने मोठे पाऊल टाकत ‘ई-समुद्र’ या सर्वसमावेशक डिजिटल

Law Admission Update : 16 कॉलेजांना 100% प्रवेशाची परवानगी; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या विधि प्रवेश (Law Admission 2026) प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक

Central Railway Mega Block : शीव आरओबीच्या कामासाठी माटुंगा-कुर्ला दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; लोकल व एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मि

Amit Shah : देशातील नागरी सहकारी बँकाचे मुख्यालय मुंबईत; केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा

दिल्लीहून मुंबईत कार्यालयाचे स्थलांतर होणार https://prahaar.in/2026/08/08/jalgaon-accident-news-four-people-narrowly-escaped-an-accident/ मुंबई : देशातील नागरी सहकारी

Devendra Fadnavis : सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळ्याची चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पाच वर्षांतील देणगी आणि दान संकलनाची तसापणी