Samruddhi Mahamarg Thane : गर्डर मशीन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर

पंतप्रधान राष्ट्रीय कोषातून केली जाणार मदत


ठाणे : ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशीन (Girder Machine) कोसळल्याने आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू, तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशीनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींना पंतप्रधान राष्ट्रीय कोषातून मदत जाहीर करण्यात आली आहे.


दुर्घटनेबद्दल कळताच राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी घटनास्थळी भेट दिली. गर्डर मशीनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे म्हणाले. त्यानुसार या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय कोषातून प्रत्येकी २ लाखांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर जखमींना उपचारांसाठी ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याआधीच काही तास ही दुर्देवी घटना घडली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Thailand Job Scam News: प्लिज..! आम्हाला वाचवा; थायलंडमध्ये अडकलेल्या तरुणांचे बेहाल, नेमकं काय प्रकरण?

महाराष्ट्रातील ३० जण गोल्डन ट्रँगलच्या जाळ्यात? परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून

Farm Loan Waiver : ५ जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार

- कृषीमंत्री दत्ता भरणे; ५६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील बहुप्रतीक्षित शेतकरी

Ketan Agarwal Murder : एका पँटने उघडलं केतनच्या हत्येचं गुपित, चेतनच्या कपड्यांवरून तपासाला नवे वळण

पुणे :  पुण्यातील (Pune) उद्योगपती केतन अग्रवाल हत्या (Ketan Agarwal Murder) प्रकरणात तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर

Nasrapur Rape Case : नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या फाशीची तत्काळ अंमलबजावणी करा

५५ दिवसात दोषारोप सिद्ध करून आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीकडून महायुती सरकार, पोलीस

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पावशीजवळ कार-पिकअपची समोरासमोर धडक

भीषण अपघातात चालक गंभीर जखमी  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर पावशी (Pawashi) येथील बेल

TET Exam : टीईटी पेपरफुटीप्रकरणी दोषींवर ‘मकोका’ लावणार; पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाईन!

विधानपरिषदेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे महत्त्वपूर्ण निवेदन मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता