PM Narendra Modi receives Lokmanya Tilak Puraskar : 'महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो', मोदींच्या भाषणाला मराठीतून सुरुवात...

टिळक पुरस्काराचा निधी नमामि गंगेला देण्याचा मोदींचा निर्णय


पुणे : 'लोकमान्य टिळक यांची आज १०३वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक देणार्‍या महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो', अशा प्रकारे मराठीने आपल्या भाषणाची सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM narendra Modi) पुणेकरांची मने जिंकली. मोदीजी भाषणासाठी येताच पुणेकरांनी मोदींच्या नावाचा एकच जल्लोष सुरु केला. आज टिळक स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya Tilak Purskar) प्रदान करण्यात आला. सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते.


आपल्या भाषणात मोदीजी म्हणाले, 'हा पुरस्कार घेताना मी जितका उत्साही आहे तितकाच भावूक झालो आहे'. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने या दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरव मोदीजींनी आपल्या भाषणात केला. 'या महत्त्वाच्या दिवशी पुण्याच्या या पावनभूमीवर आणि महाराष्ट्राच्या धरतीवर येण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे' हे वाक्य मोदींनी मराठीत म्हटल्याने सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.



मोदीजी म्हणाले, ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधूंची पवित्र धरती आहे. तसेच ती ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची आदर्श भूमी आहे. काशी आणि पुणे या शहरांची देशात विशेष ओळख आहे. इथs विद्वत्ता, चिरंजीवी आणि अमरत्वता प्राप्त झालेली आहे. या भूमीमध्ये माझा सन्मान होणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा कुठला पुरस्कार मिळतो, तेव्हा एक जबाबदारी येते. हा पुरस्कार मी १४० कोटी देशवासियांना समर्पित करतो. देशवासियांच्या सेवेत, अपेक्षांमध्ये कोणतीही कसर मी सोडणार नाही, असा विश्वास मोदीजींनी व्यक्त केला.



टिळक पुरस्काराचा निधी नमामि गंगेला देण्याचा निर्णय


टिळकांच्या नावातच गंगाधर आहे. ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचे नाव आहे, त्यांच्या नावावर मिळालेल्या या पुरस्कारासोबत जी रक्कम मला मिळाली आहे, ती सर्व गंगा नदीसाठी समर्पित करणार आहे. मी नमामि गंगा या प्रोजेक्टला हा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

Milk Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा नवा झटका; गाई-म्हशीचे दूध महागले! ११ ऑगस्टपासून नवे दर लागू

महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. डिझेल, साखर आणि पॅकिंग

Pune News : मुळा-मुठा नदीपात्रात १ दिवसाच्या चिमुरडीचा मृतदेह; खराडीतील घटनेने पुणे हादरले!

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. मुळा-मुठा

Jalgaon Airport : जळगाव विमानतळ विस्ताराला वेग ! जमीन मोजणी तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. विमानतळ

Pune Traffic Alert: पुणेकरांनो, आज घराबाहेर पडताना सावधान! महामोर्चामुळे ‘या’ मार्गांवर वाहतूक बंद; जाणून घ्या पर्यायी रस्ते

पुणे : पुणेकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील