Bandra Worli Sea Link : बाप रे! वांद्रे-वरळी सी लिंकवर गाडी थांबवून थेट पाण्यात उडी मारली...

शोधमोहीम सुरु... काय आहे आत्महत्येचं कारण?


आज दिवसभरात केवळ मुंबईतूनच थरकाप उडवणार्‍या (Mumbai News) घटना समोर येत आहेत. जयपूर एक्स्प्रेस दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच आता आत्महत्येची एक घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून (Bandra Worli Sea Link) एका ५५ वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सी लिंकवर कार थांबवून या व्यक्तीने तटरक्षक दलाला काही कळायच्या आत थेट पाण्यात उडी मारली. सध्या तटरक्षक दलाच्या मदतीने मुंबई पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. हेलिकॅाप्टरच्या साहाय्याने या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.


आज सकाळी साडेसहाच्या सुमारास विलेपार्ले येथे राहणारी एक ५५ वर्षीय व्यक्ती कारमधून वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात होती. यानंतर गाडी पुलाच्या मध्यभागी आल्यावर त्याने गाडी थांबवली आणि थेट समुद्रात उडी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून उडी मारलेल्या व्यक्तीच्या शोधात तटरक्षक दलासह इतर पथकंही गुंतली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.



काय आहे आत्महत्येचं कारण?


ही ५५ वर्षीय व्यक्ती नुकतीच एका अपघातामुळे अस्वस्थ झाली होती. प्रकृतीला कंटाळून वृद्धेने सोमवारी वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारली. सकाळी केबल-स्टेड स्ट्रक्चरमधून हा माणूस अरबी समुद्रात बुडला. सध्या या व्यक्तीला शोधण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी हा माणूस एका अपघातातून बचावला होता. मात्र, त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्याच्या तब्येतीला कंटाळून त्याने त्याच्या कुटुंबीयांना सांगितले की तो आपले जीवन संपवेल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.



वांद्रे-वरळी सी-लिंक सुसाईड पॉइंट


मुंबईतल्या वांद्रे-वरळी सी-लिंकला सुसाईड पॉइंट मानलं जातं. इथून अनेकदा लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने सरकारकडे उत्तर मागितल्यानंतर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवण्यात आली. आज पुन्हा एक घटना समोर आल्याने इथल्या हा मुद्दा वर आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Bhimashankar : ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन

मुंबई : भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात

Legal notice served to Amazon : महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबन प्रकरणी ॲमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस!

मुंबई : प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ 'आर्यभट्ट' यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन

Mumbai pune housing projects : महामुंबईतील २ लाख घरांचे स्वप्न 'रखडणार'? युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासमोर मोठे संकट

Mumbai : चालू वर्षात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो घरखरेदीदारांसाठी एक

Navi Mumbai Crime : ऑनलाइन गेमिंगच्या नादात रिक्षाचालकाची सव्वाकोटींची फसवणूक, तर मंदिरात पुजाऱ्याचाच चोरीचा प्रयत्न

Navi Mumbai : नवी मुंबई परिसरात गुन्हेगारीच्या दोन वेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत ऑनलाइन गेमिंगच्या

BKC : सकाळची वाहतूक सुरळीत; पण सायंकाळी पुन्हा कोंडीचेच चित्र

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) वाहतूककोंडीवर उपाय

Narayan Seva Sanstha : नारायण सेवा संस्थेकडून मुंबईच्या वडाळा येथील निको हॉलमध्ये १०४ दिव्यांगांना १५४ कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप

मुंबई : दिव्यांगजनांचे पुनर्वसन, आरोग्य सेवा आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी समर्पित असलेल्या भारतातील अग्रगण्य