मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंची चांगलीच कानउघडणी केली आहे. आत्मविश्वास असणं ही जमेची बाजू असली तरी आपल्याला सगळं येतं. आपण सर्वज्ञ आहोत, असं वाटू लागणं योग्य नाही. तुम्ही आत्मविश्वासू असता हे ठीक आहे. पण तुम्हाला कोणाला काहीच विचारायची गरज वाटत नाही. अनुभवी खेळाडूंकडून सल्ला घ्यावासा वाटत नाही, हे कही बरं नव्हे, अशा शब्दांत कपिल देव यांनी भारतीय संघातील खेळाडूंना सुनावलं.
ते पुढे म्हणाले, पैसे आल्यावर अहंकारदेखील येतो. काही खेळाडू असेही आहेत की त्यांच्यातला अहंकार त्यांचा सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूकडून सल्ला घेण्याच्या आड येतो. सुनिल गावसकर तिथे आहेत. तुम्ही त्यांच्याशी का बोलत नाहीत?, असा प्रश्न देव यांनी उपस्थित केला.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी काही दिवसांपूर्वीच सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंवर भाष्य केलं होतं. भारतीय क्रिकेटपटू क्वचितच आपल्याकडून सल्ला घेण्यास येतात, असं गावसकर म्हणाले होते. ‘राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हिव्हीएस लक्ष्मण माझ्याकडे नेहमी यायचे. त्यांच्या काही समस्या घेऊन ते यायचे. माझी काही निरीक्षणं त्याबद्दल असायची. त्याबद्दल मी त्यांच्याशी मोकळेपणानं बोलायचो,’ असं गावसकरांनी म्हटलं होतं.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…