मुंबई: ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी लेक सिद्धी पोंक्षे पायलट झाल्यानंतरच्या पोस्टने सोशल मिडियावर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. अभिनेते किरण माने तसेच उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षे यांच्यावर टीका करणारी पोस्ट लिहिताच आता पोंक्षे यांनीही या सर्व टीकेचा समाचार घेतला आहे. यावेळी कुणाचेही नाव न घेता एक गोष्ट लिहित शरद पोंक्षे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
त्यांनी लिहिलं की, आपण संध्या देवघरात छान दिवा लावतो, तो फक्त देवासमोर प्रकाश पाडावा, घरात प्रसन्न वाटाव म्हणुन. पण त्याची वात उंदीर घेऊन पळतो व सर्व घराला आग लावतो. तस झालं तर आग वातीन नाही लावली तर ती उंदरानं लावली. नाही तर वातीचा मंद प्रकाश फक्त देवघरा पुरताच मर्यादित राहिला असता पण उंदरानं ती वात घरभर फिरवून संपूर्ण घराला आग लावली. तसं काहीतरी चालू आहे आता दोष मंद तेवणाऱ्या वातीचा? की वात गावभर फिरवून आग लावणाऱ्या उंदराचा?”, असा सवाल पोंक्षे यांनी पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…