Monday, July 15, 2024
Homeक्रीडाSmriti Mandhana: स्टार फलंदाज स्मृती मंधाना, म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल यांच्या नात्यावर...

Smriti Mandhana: स्टार फलंदाज स्मृती मंधाना, म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल यांच्या नात्यावर पुन्हा चर्चा

स्टार फलंदाज स्मृती मंधाना(Smriti Mandhana), म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल(Palash Muchhal) यांच्या नात्यावर पुन्हा चर्चा

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. स्मृती मंधानाचे नाव बॉलिवूडचा दिग्दर्शक आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल याच्यासोबत जोडले जात आहे. अभिनेता राजपाल यादव याने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे ही चर्चा सुरू आहे. सांगलीमध्ये राजपाल यादव चित्रपटाच्या शुटिंगसाठी आलेला होता, त्यावेळी काढलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोनंतर स्मृती आणि पलाश यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे. याआधीही या जोडीची चर्चा रंगली होती.

पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल हिचा भाऊ आहे. स्मृती मंधानाला ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखले जाते. सध्या स्मृती इंग्लंडमध्ये सुट्ट्याचा आनंद घेत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याला स्मृती आणि पलाश यांनी फोटो पोस्ट केले आहेत. दोघांनी आपपाल्या सोशल मीडियावर स्वत:चे फोटो पोस्ट केले आहेत. पण एकाचवेळी हे फोटो पोस्ट केल्यामुळे यांच्यामधील नात्याची चर्चा रंगली आहे.

याआधीही पलाश-स्मृती रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, दोघांनीही याबाबत कधीच काहीच खुलासा केलेला नाही. एका व्हिडीओमध्ये पलाशच्या हातावर SM18 नावाचा टॅटूही दिसला होता. या टॅटूला चाहत्यांनी स्मृती मानधनाच्या जर्सी नंबरसोबत जोडले होते. मात्र, यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नव्हते. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
७ जुलै रोजी पलाशने स्मृती मंधानासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरील राजपाल यादव याच्या कमेंटनंतर ते दोघेही एकमेकांना डेट करतायेत, हे समोर आले. राजपालने कमेंट करत लिहिले होते की, ‘सुंदर जोडपे. देव तुम्हा दोघांना आनंदी ठेवो.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -