Nigar Sultana vs Haramanpreet: बांगलादेशची महिला कर्णधार निगर सुलतानाचे हरमनप्रीतवर पुन्हा टीकास्र

Share

भारत आणि बांगलादेश महिला एकदिवसीय मालिका संपली. तरी त्याचा वाद मात्र अजून संपलेला नाही. मीरपूरमधील तिस-या एकदिवसीय सामन्याच्या वेळी अंपायरिंगवरून बराच गदारोळ झाला. त्यानंतर भारतीय संघाला बांगलादेश दौरा संपवावा लागला. अंपायरने दिलेल्या एलबीडब्ल्यू आऊटवरून हा वाद रंगाला होता. त्याची शिक्षा देखील हरमनप्रीला(harmanpreet kaur) मिळाली. या शिक्षेवरून आता बांगलादेशची कर्णधार निगर सुलतानाने(Nigar Sultana) टीका केली आहे. मागील आठवड्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तिला पंचांनी पायचित बाद केले. पंचांच्या निर्णयाने नाराज झालेल्या हरमनने स्टम्पवर आपला राग काढला. त्यानंतर सामना संपवल्यावरही तिने पंच, सामना अधिकाऱ्यांवर टीका केली होती.

आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हरमनप्रीत कौरला(harmanpreet kaur) पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निलंबित करण्यात आले आहे, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. या निलंबनामुळे हरमनप्रीत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. नाहिदा अख्तरच्या चेंडूवर हरमनप्रीतल पायचित बाद करण्यात आले. पण तो चेंडू तिच्या बॅटला लागला असल्याचा दावा तिने केला. पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी तिने आपला राग यष्टींवर काढला. त्यानंतर हरमनने बक्षीस वितरण समारंभात पंचांवर टीका केली. या मालिकेचे संयुक्त विजेते असलेल्या संघांसोबत पंचांनी ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावे, असेही हरमनने म्हटले होते. असभ्य वर्तनामुळे बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने(Nigar Sultana) आपल्या संघासह ते ठिकाण सोडले आणि भारतीय कर्णधाराला शिष्टाचार शिकण्याचा सल्ला दिला.

मागेही एकदा तिने सामन्यानंतर हरमनप्रीतवर टीका केली होती. निगर म्हणाली, ही पूर्णपणे तिची समस्या आहे. याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एक खेळाडू म्हणून ती अधिक चांगली वागणूक दाखवू शकली असती. हरमनप्रीतच्या त्या कृतीवर आयसीसीने घेतलेली अ‍ॅक्शन स्वागतार्ह आहे. मात्र, झालेली शिक्षा ही कमी की जास्त यावर फारशी बोलणार नाही. तिने त्यावेळी थोडा आदर दाखवणे आवश्यक होते. झालेली घटना निंदनीय स्वरुपाची आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

20 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

40 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago