
नवी मुंबई : पावसामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे शुक्रवारी पहाटे केमिकलचा टँकर पलटी झाला. तर तुर्भे पुलावरही अपघात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकाळीच वाहतूक विस्कळीत झाल्याने कार्यालयात निघालेल्या नागरिकांची गैरसोय झाली.
शुक्रवारी पहाटे हायड्रॉलिक केमिकल घेऊन जाणा-या टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला. बेलापूर अग्निशमन दलाच्या वाहनांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी धूर झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. टँकर रोडच्या मध्येच कलंडल्याने वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागली.