Suicide Case in Pune : पुण्यात आणखी एक खळबळजनक घटना... फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लावला गळफास!

नेमकं काय घडलं?


पुणे : पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अनेक चित्रविचित्र घटना घडत आहेत. पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या तरुण विद्यार्थ्यांच्या बाबतीतील या घटना जास्त प्रमाणात आहेत. अशीच एक खळबळजनक घटना पुन्हा समोर आली आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) शिकणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओम कापडणे (Om Kapadane) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्यातील वडारवाडी इथल्या विष्णू कुंज वसतिगृहात (Vishnu Kunj Hostel) राहत होता आणि या ठिकाणीच त्याने आत्महत्या केली.


ओम कापडणे फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात (BSc Third year) शिकत होता. तो मूळचा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील होता आणि शिक्षणाकरता त्याने पुणे गाठले होते. पुण्यात वडारवाडी इथल्या विष्णू कुंज वसतिगृहात तो राहत होता. याच वसतिगृहात त्याने गुरुवारी २७ जुलैला गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच ओमला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित केलं.


या प्रकरणाची चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ओमने हे पाऊल का उचलले याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याने वसतिगृहातील ज्या खोलीत गळफास घेतला तिथे कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही किंवा अजूनपर्यंत काही हाती लागलेले नाही. त्यामुळे पोलीस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा कसून तपास सुरु असल्याचं चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया