Rain Updates : मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपले!

  161

आज सकाळपर्यंत 'रेड अलर्ट' कायम


मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूरला देखील पावसाने चांगलेच झोडपले आहे.


मागील काही दिवसांपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तर मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देखील देण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे लोकल सेवा धिम्या गतीने सुरू आहे. मुंबईतील काही परिसरांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.


पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.


मुंबईत काल दुपारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. पण पावसाचा वाढता जोर पाहून हवामान विभागाने रेड अलर्टचा कालावधी वाढवला आहे. सध्याच्या पावसाचा जोर पाहता आज सकाळी ८:३० वाजेपर्यंत रेड अलर्ट वाढवण्यात आला आहे.


पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून रात्रीपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे सर्वात मोठी पाणी क्षमता असलेले धामणी धरण भरले असून रात्री दोन वाजता धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघण्यात आले असून धामणी मधून पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्य नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धामणी धरणातून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांना पाणीपुरवठा होतो. तसेच सूर्या प्रकल्पाच्या उजवा आणि डावा कालव्याच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठीही पाणीपुरवठा करण्यात येतो.


मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर जवळील बारवी धरण देखील धोक्याच्या पातळीपर्यंत भरले आहे, त्यामुळे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडले जातील आणि बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल.


पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात मुसळधार पाऊस जव्हार नगरपालिका हद्दीतील जांभूळ विहीर भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. अति मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.


पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून ठीक ठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर पुराचे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे रस्तेही बंद होण्याची पाळी निर्माण झाली आहे. विक्रमगड तालुक्यातील जव्हार कासा रोडवरील तलवाडा येथील मोरीवर पुराचे पाणी आल्यामुळे हा रस्ता सुद्धा बंद झाला आहे. तर सारणी उरसे ऐना या रोडवरील साकवांवर पुराचे पाणी आल्यामुळे जवळपास बारा गावांचा संपर्क तूटला आहे.


हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकत आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत आता दर १०० मीटर अंतरावर बसवल्या जाणार कचरापेट्या

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांसाठी कचरा उचलण्यासाठी मोठ्या आणि छोट्या कॉम्पॅक्टरसह

मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य व हार्बर मार्गावर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा ५० टक्के

जुलैच्या पहिल्याच आठवड्यातील पावसाने साधली किमया मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

मालवाहतूकदार संघटनांच्या आजच्या बैठकीत ठरणार संपाची दिशा

बचाव कृती समितीमधून संघटनांच्या माघारीस सुरुवात मुंबई : राज्यातील अवजड वाहने, मालवाहतूकदार संघटनांनी संप सुरू

स्थानिक स्वराज्य संस्थांना 'एक टक्के' नोंदणी निधी थेट हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव!

प्रक्रिया अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार, महसूलमंत्र्यांची विधानसभेत

बोरिवली येथील खादी ग्रामोद्योग ट्रस्टला जमीन हस्तांतरण कायदेशीर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेत स्पष्टीकरण मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी