Samruddhi Highway : अपघातांनंतर समृद्धी महामार्ग आता डिझेलच्या चोरीमुळे चर्चेत

एकाला बेड्या घालण्यात पोलिसांना यश


वाशिम : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघातांच्या मालिकेनंतर आता उभ्या वाहनातून डिझेल चोरणार्‍या टोळीचे (Theft of diesel) प्रकरण चर्चेत आले आहे. या टोळ्या रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या ट्रक आणि कंटेनरसारख्या गाड्यांच्या डिझेल टँकमधून पाईप आणि मोटरच्या साहाय्याने डिझेल चोरतात. आज सकाळी समृद्धी महामार्गावर कारंजा जवळ पुन्हा डिझेल चोरणाऱ्या एका आरोपीला गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र अनिल पवार, गजानन पवार, योगेश दाजी हे तीन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री वाशिमच्या (Washim) वनोजा जवळ पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना एका गाडीतून डिझेल चोरीला जात असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी या चोरांचा पाठलाग सुरु केला. या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.


अनेकदा या महामार्गावर चोरीच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यातच आता डिझेल चोरीच्या घटनांनी नागरिक पुन्हा एकदा त्रस्त झाले असल्याचं म्हटलं जात आहे. रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान या टोळीतील एकाला बेड्या घालण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या